AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत पकडला, केरळात गेला, ATSला मोठी लीड; आंतरराष्ट्रीय कनेक्शन…नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

Navi mumbai ats action : नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून महाराष्ट्र एटीएसने यश सिंग या 20 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो देशविघातक घटकांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची, विशेषतः कुलाब्यातील छाबाड हाऊसची रेकी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

नवी मुंबईत पकडला, केरळात गेला, ATSला मोठी लीड; आंतरराष्ट्रीय कनेक्शन...नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
Navi mumbai ats action Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 8:21 PM
Share

सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आणि देशविघातक घटकांच्या संपर्कात राहून मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. यश सिंग असे या तरुणाचे नाव असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर केरळ पोलिसांनी नवी मुंबईत येऊन त्याला अटक केली. केरळमधील त्रिशूर येथे दाखल असलेल्या UAPA गुन्ह्याच्या तपासात या तरुणाचे धागेदोरे समोर आल्याची माहिती आहे.

ज्यू आणि परदेशी नागरिक, त्यांच्या कंपन्या, वाहने तसेच संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि लोकेशन पाठवण्यासाठी यश सिंगला आर्थिक मोबदला दिल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. केरळमधील त्रिशूर ईस्ट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या UAPA प्रकरणाशी त्याचे धागेदोरे जोडले गेले आहेत. नवी मुंबई एटीएसने माहिती दिल्यानंतर केरळ पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन त्याला अटक केली.

छाबाड हाऊससह संवेदनशील ठिकाणांची रेकी

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यश सिंग याला मुंबईतील संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करण्याचे काम सोपवण्यात आले होते. विशेषतः कुलाब्यातील ज्यू प्रार्थनास्थळ असलेल्या छाबाड हाऊस (सिनॅगॉग) परिसराची रेकी करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. ज्यू नागरिक, परदेशी नागरिक, त्यांच्या कंपन्या, वाहने आणि संबंधित ठिकाणांचे फोटो काढून त्यांची अचूक लोकेशन पाठवण्यास त्याला सांगण्यात आले होते.

टेलिग्राम ग्रुपमधून संपर्क, पैशांचाही मोबदला

यश सिंग हा टेलिग्रामवरील देशविघातक घटकांच्या ग्रुपच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. संवेदनशील ठिकाणांची माहिती आणि छायाचित्रे पाठवण्याच्या कामासाठी त्याने वेळोवेळी आर्थिक मोबदला स्वीकारल्याचेही निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या आणि देशविघातक घटकांशी त्याचा संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.

नवी मुंबई ATS ने याबाबत त्रिशूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर केरळ पोलिसांचे पथक नवी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर यश सिंगला अटक करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे केरळमधील त्रिशूर ईस्ट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या UAPA गुन्ह्यातील इतर आरोपींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर पैशांचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जात असल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना संवेदनशील ठिकाणांचे फोटो किंवा माहिती पाठवू नये, असे आवाहन ATS ने केले आहे.

Follow Us
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?