
Sushant Singh Rajput and Aishwarya Rai: 90 च्या दशकात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज ऐश्वर्याला कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक अभिनेत्यांसोबत ऐश्वर्या हिने काम केलं आहे. अशाच अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत… फार कमी लोकांना माहिती आहे की एका शोमध्ये ऐश्वर्याने दमदार डान्स केला होता. तेव्हा सुशांत याने देखील अभिनेत्रीसोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. सध्या त्यांच्या डान्स परफॉर्मेंन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत – ऐश्वर्या यांच्या डान्सची चर्चा रंगली आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ 2006 चा असून मेलबर्नमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभाचा आहे. सांगायचं झालं तर, सुशांत जेव्हा स्ट्रगल करत होता, हा व्हिडीओ तेव्हाचा आहे. म्हणून सुशांतच्या चाहत्यांसाठी व्हिडीओ प्रचंड खास आहे. व्हिडीओमध्ये सुशांत मोठ्या उत्साहात डान्स करताना दिसत आहे. तर ऐश्वर्याला उचलताना देखील अभिनेता दिसला. यावर सुशांतने एक खास किस्सा देखील सांगितला होता.
सुशांत सिंह राजपूत म्हणाला, ‘लीड डान्सर ऐश्वर्या राय हिला मला उचलायचं होतं. डान्सच्या शेवटी मी तिला उचलतो. पण पुन्हा तिला खाली ठेवायलाच मी विसरलेलो. जवळपास 1 मिनिटं मी ऐश्वर्याला उचललं होतं. ऐश्वर्या देखील हैराण होती, की मी तिला खाली का नाही ठेवत आहे.’ यानंतर सुशांत कॉलेजमध्ये प्रसिद्धीझोतात आलेला…
सुशांत सिंह राजपूतने इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्याची अभिनय कारकीर्द टीव्हीवरून सुरू झाली. “पवित्र रिश्ता” सारख्या टीव्ही मालिकांमधून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर 2013 मध्ये त्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याचं नाव होते “के पो चे!”.
शानदार पदार्पण केल्यानंतर, त्याने “एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी”, “केदारनाथ” आणि “छिछोरे” सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं. पण 2020 मध्ये, मानसिक ताणामुळे त्याने आत्महत्या केली. त्यामुळे सुशांतच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता त्याचे चाहते त्याचे जुने व्हिडिओ शेअर करून त्याच्या जुन्या आठवणी ताज्या करतात.