Bollywood | परदेशात भयानक अपघात, अभिनेत्रीच्या कारखाली दोघे चिरडले, वाईट प्रसंगानंतर पतीसोबत….

Bollywood | अभिनेत्रीच्या कारखाली दोघे चिरडले, अभिनेत्रीसोबत पती वादाच्या भोवऱ्यात, वाईट प्रसंगानंतर पतीसोबत अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र अभिनेत्री आणि पतीची चर्चा... शाहरुख खान याच्या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्यामुळे आली होती प्रसिद्धी झोतात...

Bollywood | परदेशात भयानक अपघात, अभिनेत्रीच्या कारखाली दोघे चिरडले, वाईट प्रसंगानंतर पतीसोबत....
| Updated on: Oct 07, 2023 | 12:46 PM

मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘स्वदेस’ सिनेमामुळे अभिनेत्री गायत्री जोशी प्रसिद्धी झोतात आली होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण नुकताच झालेल्या भयानक अपघातामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र गायत्री जोशी आणि पती विकास ओबेरॉय यांची चर्चा रंगली आहे. इटलीतील सार्डिनिया येथे झालेल्या रस्ते अपघातानंतर ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशी आणि बिझनेसमन पती विकास ओबेरॉय शुक्रवारी मुंबईत परतले आहेत. पण दोघांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपघातात एक स्विस दाम्पत्य दगावले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पतीसोबत भारतात परतली अभिनेत्री

रिपोर्टनुसार, इटलीतील कार अपघातात, अभिनेत्री आणि तिच्या पती विरोधात प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सोमवारी झालेल्या हृदयद्रावक कार अपघातात सहभागी असलेल्या कारपैकी एक कार अभिनेत्रीचा विकास चालवत होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे… अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

हृदयद्रावक अपघाताचं कारण शोधण्यासाठी इटलीतील परराष्ट्र विभागाने एका तज्ज्ञाची नियुक्ती केली आहे. कॅग्लियारी, सार्डिनिया येथील वकिलांनी ‘डबल रोड हत्याकांड’वर तपास सुरू केला आहे. संबंधीत प्रकरणी अभिनेत्रीचा पती विकास दोषी आढळल्यास त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

स्वित्झर्लंडचे दाम्पत्य

या अपघातात दगावलेल्या दोन्ही दाम्पत्यांची ओळख पटली आहे. दोघेही स्वित्झर्लंडचे रहिवाशी आहेत. मेलिसा क्रोटली वय 63 आणि मार्कस क्रौटली वय 67 असं या दाम्पत्यांचं नाव आहे. एका न्यूज वेबसाईटला गायत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. विकास आणि मी इटलीत आहे. आम्ही एका दुर्घटनेचे शिकार झालो आहोत. देवाच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप आहोत, असं तिने म्हटलं आहे.

गायत्री जोशी सध्या काय करते?

शाहरुख खानसोबत ‘स्वदेस’ सिनेमा केल्यानंतर एका वर्षानंतर गायत्री जोशीने बिझनेसमन विकास ओबेरॉय याच्याशी लग्न केले. यासोबतच या अभिनेत्रीने ग्लॅमर इंडस्ट्रीलाही कायमचा निरोप दिला. गायत्रीचे पती विकास ओबेरॉय मुंबईत रिअल इस्टेट फर्म चालवतात. अभिनेत्री तिच्या पतीचा व्यवसाय देखील सांभाळते. दोघांना दोन मुले आहेत.

 

Follow Us