
अभिनेत्री स्वरा भास्करची आई आणि सिनेमा अभ्यासक इरा भास्कर यांनी नुकताच समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील राजकारणावरील चर्चेदरम्यान आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ सिनेमावर टीका केली. एवढंच नाही तर, इरा भास्कर यांनी आदित्य धर यांच्या विचारसरणीवरही स्वतः मत व्यक्त केलं आणि सांगितले की. त्याची विचारसरणी नेहमीच हिंदुत्वाबद्दल राहिली आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत ‘धुरंधर’ सिनेमा मुस्लीम आणि पाकिस्तानी नागरिकांना हिंसक दाखवल्यामुळे टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.
इरा भास्कर म्हणाल्या, ‘मी तुम्हाला धुरंधर सिनेमाचं एक उदाहरण देते. जो सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. सर्वात ताजं उदाहरण म्हणजे सिनेमा बक्कळ कमाई करत आहे… हा एक असा सिनेमा आहे, ज्याचं दिग्दर्शन आदित्य धर याने केलं आहे. जे हिंदुत्व आणि हिंदुत्व विचारसरणीवर अधिक विश्वास ठेवतात…
‘धुरंधर’ सिनेमात मुस्लिमांना अधिक हिंसक दाखवलं आहे. यावर इरा भास्कर म्हणाल्या, ‘हे प्रचंड हिंसक आहे… तेथील हिंसाचार अशा विचारसरणीला प्रोत्साहन देतो की, मुस्लिम खूप हिंसक लोक आहेत. पाकिस्तान हा एक अतिशय हिंसक देश आहे. तुम्हाला तिथे सामान्य मुस्लिम दिसत नाहीत. प्रत्येकजण एकतर दहशतवादी किंवा गँगस्टर आहे.’
सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे असं सांगण्यात आलं होतं. यावर इरा भास्कर म्हणाल्या, ‘हा एक काल्पनिक सिनेमा आहे… जो कथितरित्या सत्य घटनांवर आधारित आहे… गोष्टी निवडकपणे निवडेल ज्या एका विशिष्ट विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र असे सिनेमे तयार केले जातात.
‘धुरंधर’ सिनेमानंतर आता ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘धुरंधर 2’ बद्दल अनेक चर्चांनी आता जोर धरला आहे. आता प्रत्येक जण फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमा प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे, त्याच प्रमाणे सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे…
‘धुरंधर 2’ सिनेमात दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. सिनेमात यामी कॅमियो करताना दिसणार आह … पण यामी व्यतिरिक्त, निर्माते सिनेमात आणखी एक खास कॅमिओ करण्याची योजना आखत आहेत, असं देखील रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.