AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UBT Shiv Sena: बंडखोर खासदार कोणत्या सेनेत? शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पोस्टने वाढला सस्पेन्स… पोस्टवर फोटो कुणाचा?

UBT Shivsena Rebel MPs Social Media Post Viral: उद्धव सेनेत उभी फुट पडल्यानंतर आता खासदारांचा हा गट कोणत्या सेनेत विलीन होतो याची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत ते जाणार असल्याची चर्चा असतानाच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने सस्पेन्स वाढवला आहे.

UBT Shiv Sena: बंडखोर खासदार कोणत्या सेनेत? शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पोस्टने वाढला सस्पेन्स... पोस्टवर फोटो कुणाचा?
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेना, ऑपरेशन टायगरImage Credit source: सोशल मीडियावरुन सभार
| Updated on: Jun 19, 2026 | 10:10 AM
Share

Shivsena Operation tiger: उद्धव सेनेत बंड झाले. सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र धाडले. तर कालच्या पक्षाच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली. उद्धव सेनेचे तीनही खासदार माध्यमांसमोर आलेत. पण अद्याप 6 खासदार अज्ञात स्थळी असल्याचा दावा करण्यात येत आहे. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने या खासदारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वर्धापन दिनाच्या शुभेच्छांची पोस्ट केली आहे. पण या पोस्टनेच खरा सस्पेन्स वाढवला आहे. हे खासदार आता कोणत्या सेनेचे? असा सवाल केल्या जात आहे.

त्या पोस्टने वाढवला सस्पेन्स

सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाचे कॅप्टन हे परभणीचे खासदार संजय(बंडू) जाधव असतील, अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या खासदारांची x आणि फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी केलेल्या या पोस्टमध्ये आणि इतर माध्यमांवरील पोस्टमध्ये बाळासाहेबांव्यतिरिक्त कोणाचाही फोटो वापरण्यात आलेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेच्या भुवया ताणल्या आहेत.

शिवसेना वर्धापन दिनीच्या या पोस्टमधूनही या खासदारांनी त्यांच्या मनातील गुपीत बाहेर येऊ दिलेले नाही. ही एक स्ट्रॅटर्जी मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर खासदारांचा हा गट शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चा आहे. ऑपरेशन टायगर हे त्यासाठीच राबवल्या गेल्याचा दावा आहे. पण आज केलेल्या या पोस्टमध्ये ना एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे ना आनंद दिघे यांचा फोटो आहे. त्यामुळे वर्धापन दिनानंतर हे खासदार त्यांचे पत्ते उलगडण्याची शक्यता आहे.

6 खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश कधी?

संजय दिना पाटील

संजय देशमुख

संजय जाधव

भाऊसाहेब वाकचौरे

नागेश पाटील आष्टीकर

ओमराजे निंबाळकर

या उद्धव सेनेच्या 6 खासदारांनी पक्षात बंड केले हे आता निश्चित झाले आहे. त्यांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याचे समजते. तर पक्षांतर कायद्याचा कोणताही फटका बसू नये यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे. त्याचवेळी सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कधी प्रवेश करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची भूमिका 20 जून रोजी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्या हे खासदार त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काहींच्या मते विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर या खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होऊ शकतो. अर्थात जोपर्यंत हे खासदार समोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत सस्पेन्स कायम आहे. फेसबूक आणि एक्स पोस्टच्या माध्यमातूनही या खासदारांनी कोणतीच हिंट दिलेली नाही हे विशेष.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!