AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UBT Shivsena: ही तर आमची माणसं… पण आमच्या काळजावर घाव… खासदार फुटीनंतर सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात टचकन पाणी…

Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगर अखेर फत्ते झाले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी अर्ज केला. काल उद्धव सेनेचा व्हिप झुगारला, बैठकीला दांडी मारली. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच ही घडामोड घडली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

UBT Shivsena: ही तर आमची माणसं... पण आमच्या काळजावर घाव... खासदार फुटीनंतर सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात टचकन पाणी...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवेसना फूटImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 19, 2026 | 8:56 AM
Share

Sushma Andhare on Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला खिंडार पडले. 9 पैकी 6 खासदारांनी बंड पुकारले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज सादर केला. काल पक्षाचा व्हिप झुगारला. बैठकीला दांडी मारली. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच ही मोठी घडामोड अनेकांच्या काळजाला बोचणी लावून गेली. यापूर्वी 2022 मध्ये शिवेसेनेत मोठी फूट पडली होती. त्यानंतर पक्ष सावरला आणि नव्या दमाने, नवीन चिन्हावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभा राहिला. 9 खासदार निवडून आले. आता त्यातील 6 जणांनी बंड पुकारले आहे. यावर बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे भावनिक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले.

ही तर आमची माणसं, पण…

उद्धव सेना फुटीवर सुषमा अंधारे यांनी मन मोकळं केले. परवा झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी या बंडाची विस्तृत माहिती दिली होती. या बंडाचे नेतृत्व वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्याकडे असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कशी फसवणूक केली हे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. त्याचवेळी या खासदार फुटीवर त्या भावनिक झाल्या.

ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव ही आमची माणसं होती. आमच्या काळजावर घाव झाला आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. गेलेल्या लोकांना ऑफर दिली म्हणून ते गेले असतील.उद्या भाजपने मोठी ऑफर दिल्यावर काय करतील, अशी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे भावनिक झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना भावना अनावर झाल्या.

पक्ष नेतृत्वाकडून काय अपेक्षा

यावेळी त्यांनी आजच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्ष नेतृत्व या फुटीवर, दुसऱ्यांदा असे घडले आहे, त्यावर बोलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचवेळी त्यांनी पक्ष नेतृत्वाने मराठवाडा आणि विदर्भात यावे, सर्वांची भेट घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संजय दिना पाटील निवडून यावे यासाठी त्यांनी सभा लावण्याची विनंती केली होती. आता केवळ घरात घुसण्याची भाषा केली तर त्यांनी घाबरून पोलीस बंदोबस्त लावून घेतला. ही कसली टायगर आहेत, ही पळपुटे लोक आहेत. त्यांनी बंडखोरांवर टीका केली. यावेळी सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!