एकदा नाही तर अनेकदा वन नाईट स्टँड..; अभिनेत्रीची खुली कबुली, सकाळी उठून थेट म्हणाली..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीला वन नाईट स्टँडबद्दल प्रश्न विचारला असता तिने खुलेपणाने उत्तर दिलं. मी एकदा नाही तर अनेकदा वन नाईट स्टँड केल्याची कबुली तिने दिली.

एकदा नाही तर अनेकदा वन नाईट स्टँड..; अभिनेत्रीची खुली कबुली, सकाळी उठून थेट म्हणाली..
अभिनेत्री श्वेता केसवानी
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2026 | 3:04 PM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता केसवानी तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत, श्वेताने तिच्या वन नाईट स्टँडविषयी खुलासा केला. एकदा नव्हे तर अनेकदा वन नाईट स्टँड केल्याचं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्यातले काहीजण आज चांगले मित्र असल्याचंही तिने सांगितलं आहे. यावेळी श्वेता तिच्या पूर्व पतीविषयीही व्यक्त झाली.

वन नाईट स्टँडबद्दल काय म्हणाली?

“मी बऱ्याचदा वन नाईट स्टँड केला आहे आणि ते माझे चांगले मित्रही आहेत. काहींसोबत तर मी रिलेशनशिपमध्येही होती. मी टाइमपास करत नव्हती, तर सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. मानसिक आकर्षण जाणवल्याशिवाय मी कोणत्याच पुरुषाच्या जवळ जात नाही. माझ्यासाठी ती एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी अनोळख्या व्यक्तीसोबत वन नाईट स्टँड करू शकत नाही. पण ज्या पुरुषांबद्दल मला मानसिक आकर्षण जाणवलं, त्यांच्यासोबतच मी रिलेशनशिपमध्ये होते. वन नाईट स्टँडच्याही आधी मला त्या व्यक्तीला नीट ओळखायचं असतं. अन्यथा ते खूपच विचित्र वाटेल. ती व्यक्ती मला आवडू लागल्यावर वन नाईट स्टँड करू शकते,” असं ती म्हणाली.

Loading...

याविषयी ती पुढे म्हणाली, “काहीवेळा तर वन नाईट स्टँडनंतर मी त्यांना स्पष्ट बोलले की, मला तू बेडवर नाही आवडलास. तरीसुद्धा ते आज माझे चांगले मित्र आहेत. मी वन नाईट स्टँडच्या विचारानेच हे सगळं करत नाही. एखादी व्यक्ती मला आवडते, आमचं चांगलं जमू लागतं, तेव्हाच मी एक पाऊल पुढे ठेवते. हीच गोष्ट माझ्या पूर्व पतीसोबतही झाली आहे. आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो आणि गोष्टी पुढे गेल्यानंतर आम्ही लग्नसुद्धा केलं. पण कधीकधी लग्नही टिकत नाही. माझ्यासाठी सेक्शुअल केमिस्ट्रीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.”

श्वेताने एलेक्स ओनेलशी 2008 मध्ये लग्न केलं. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2011 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. विभक्त झाल्यानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us