
सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबाबत काहीना काही अपडेट्स देत असतात. आता प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि रॅपर बादशाहने एक फोटो शेअर केला ज्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले आहेत आहेत. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत आणि प्रत्येकजण त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. या फोटोंमध्ये बादशाहचा एक डोळा स्पष्टपणे सुजलेला दिसत आहे. चाहते सतत त्याला विचारत आहेत की त्याला नक्की काय झाले आहे.
डोळ्यांवर पट्टी बांधलेली अन् चेहरा पूर्णपणे सुजलेला
रॅपर बादशाह सध्या त्याच्या नवीन गाण्या ‘कोकैना’मुळे चर्चेत आहे , पण त्याच्या फोटोने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे आणि त्याचा चेहरा पूर्णपणे सुजलेला आहे. असे दिसते की तो गंभीर जखमी आहे. पण नक्की त्याच्यावर हल्ला झाला आहे की अपघात? याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे. तर, दुसरीकडे चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.तथापि, काही लोकांना हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचा संशय आहे आणि ते एखाद्या नवीन गाण्याचा किंवा व्हिडिओ शूटचा भाग असल्याचे मानतात.
” अवतार जी का मुक्का हिट करता है जैसे…”
बादशाने फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले आहे की, ” अवतार जी का मुक्का हिट करता है जैसे…” “बॅड्स ऑफ बॉलिवूड” आणि “कोकैना” हे हॅशटॅग वापरले आहेत. बादशाह आर्यन खानच्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सिरीजमध्ये मनोज पहवा, ज्याला अवतार म्हणूनही ओळखले जाते, त्याच्याशी टक्कर देताना दाखवले आहे. कदाचित ही सिरीज बादशाहच्या या आजाराचे कारण असेल. तो असेच संकेत देत असल्याचं दिसत आहे. त्याची ही अवस्था पाहून सोशल मीडियावर देखील युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहे. खरंतर बादशाहने गंमतीने “अवताराचा पंच” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
युजर्सच्या गंमतीशीर कमेंट्स आहेत
एका युजर्सने गंमतीने त्याला विचारत म्हटलं आहे, “मनोज पाहवा सरांनी तुम्हाला मारले का?” दुसऱ्याने म्हटले की, “मी मुलांना घेऊन येऊ का?”, तर एका चाहत्याने लिहिले, “बादशाह, स्वतःची काळजी घे.” दुसऱ्याने म्हटलं आहे, “तुला कोणी मारले?” तर काही जण त्याला ट्रोल करत आहेत, तर काही जण लवकर बरे होण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सांगत आहे. बादशाहचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.