‘मी फक्त इंडस्ट्रीमध्ये पैशांसाठी…’, तापसी पन्नूचा चित्रपटांबाबत मोठा खुलासा

'मी कोणासारखी बनण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आली नाही', बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने सांगितलं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये येण्याचं कारण. नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

मी फक्त इंडस्ट्रीमध्ये पैशांसाठी..., तापसी पन्नूचा चित्रपटांबाबत मोठा खुलासा
| Updated on: Jan 08, 2026 | 1:05 PM

Taapsee Pannu : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमी तिच्या अभिनय आणि वेगवेगळ्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच ती तिच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील सतत चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अशातच आता तापसी पन्नूने इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचे तिचे कारण सांगितले आहे.

तापसी नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त करत असते. नुकतेच तिने तिच्या करिअर संदर्भात मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तिला तिच्या करिअरमध्ये दिलासा मिळाला आहे. यासोबतच तिने हे देखील सांगितले की ती एखादा चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवते.

असे चित्रपट करण्यास तापसी देते पसंती

अभिनेत्री तापसी पन्नूने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तिने तिला ओळख निर्माण करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. यामध्ये ती म्हणाली की, अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तिला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. त्यानंतर तिला वाटले की मी अशा चित्रपटांमध्ये चांगला अभिनय करू शकते. ज्यामध्ये माझे ह्रदय आणि माझे मन पूर्णपणे मी जे सादर करत आहे. ज्यामध्ये मी गुंतलेले असते.

असे प्रोजेक्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. म्हणून आता मी फक्त माझ्या मनाचे ऐकते. त्यामुळे आता मी असे प्रोजेक्ट निवडत नाही जे फक्त माझा बँक खाते वाढवतात, तर मी आता असे प्रोजेक्ट निवडते जे माझ्या अभिनयाला चालना देतात. त्यामुळे मी सध्या एक नवीन मार्ग निवडला आहे ज्यावर अनेक लोक चालत नाहीत.

अभिनेत्री तापसीने या मुलाखतीत आणखी एक खुलासा केला की, तिने असे काही प्रोजेक्ट आणि भूमिका निवडल्या ज्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्या नाहीत. परंतु, तापसीने साकारलेल्या काही वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिला यश देखील मिळाले. तेव्हापासून, ती पारंपारिक सूत्राकडे दुर्लक्ष करून तिच्या मनावर विश्वास ठेवते. तिने यावेळी हे देखील कबूल केले की तिने स्वतःचा कार्यप्रणाली तयार केला आहे.

तापसीबाबत थोडक्यात

तापसी पन्नूच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ती शेवटची 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खेल खेल में’ या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट होता. त्यानंतर ती लवकरच वो लडकी है कहां?, गांधारी आणि दुर्गा या चित्रपटात दिसणार आहे. यामधील तिने दुर्गा चित्रपटाचे शूटिंग देखील सुरु केले आहे.