Taarak Mehta | मालव राजदा आणि जेनिफर मिस्त्री यांची भेट, असित कुमार मोदीचे टेन्शन वाढणार? धक्कादायक आरोपांनंतर

गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका जोरदार चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Taarak Mehta | मालव राजदा आणि जेनिफर मिस्त्री यांची भेट, असित कुमार मोदीचे टेन्शन वाढणार? धक्कादायक आरोपांनंतर
| Updated on: Sep 07, 2023 | 7:57 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन (Entertainment) करताना दिसत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेवर चाहते प्रेम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत. मुळात म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला कलाकार हे मोठ्या प्रमाणात सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या सुरूवातीपासून असलेले लोक मालिकेला रामराम करत आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मोठ्या वादात सापडलीये. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने काही दिवसांपूर्वीच असित कुमार मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले आहेत.

जेनिफर मिस्त्री हिचे आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. जेनिफर मिस्त्री हिच्यानंतर प्रिया आहुजा हिने देखील असित कुमार मोदी यांच्यावर आरोप केले. आता नुकताच जेनिफर मिस्त्री हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेनिफर मिस्त्री हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालव राजदा हा देखील दिसतोय.

मालव राजदा हा तारक मेहता मालिकेचा डायरेक्टर होता. काही दिवसांपूर्वीच त्याने शो सोडला आहे. मालव राजदा आणि जेनिफर मिस्त्री हे बऱ्याच दिवसांनंतर भेटले आहेत. या व्हिडीओमध्ये मालव राजदा हा जेनिफर मिस्त्री हिला म्हणताना दिसतोय की, तुम्ही माणूस आहात साबण नाही, सर्वांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

मालव राजदा आणि जेनिफर मिस्त्री हे खूप चांगले मित्र आहेत. मालव राजदा आणि जेनिफर मिस्त्री हे दोघेही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, याबद्दल अजूनही मालव राजदा आणि जेनिफर मिस्त्री यांनी काही भाष्य केले नाहीये. तारक मेहता मालिकेत बऱ्याच वर्षांपासून तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा हे बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार आहेत.

शैलेश लोढा यांनीही काही दिवसांपूर्वीच असित कुमार मोदींवर काही आरोप केले. इतकेच नाही तर मला माझ्या कामाचे पैसे दिले जात नसल्याचे देखील शैलेश लोढा यांनी म्हटले. शैलेश लोढा आणि असित कुमार मोदी यांच्यामधील वाद थेट कोर्टात पोहचला. यामुळे आता बिग बाॅस 17 मध्ये शैलेश लोढा काय काय खुलासे करतात. याकडे सर्वांच्या नजरा आहेत.