Munmun Dutta: ‘तारक मेहता..’मधल्या ‘बबिताजी’चा अपघात; ट्रिप रद्द करून परतावं लागतंय घरी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेती बबिताजीचा ट्रिपदरम्यान अपघात; पोस्ट लिहून दिली माहिती

Munmun Dutta: तारक मेहता..मधल्या बबिताजीचा अपघात; ट्रिप रद्द करून परतावं लागतंय घरी
Munmun Dutta
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2022 | 2:47 PM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, बबिता, टप्पू, चंपक चाचा या भूमिकांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. यापैकी मालिकेत बबिता जी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचा जर्मनीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुनमुन यांना फिरण्याची खूप आवड असल्याने त्यांनी आठवडाभरापूर्वी युरोप ट्रिपची सुरुवात केली होती. मात्र दुर्दैवाने जर्मनीत त्यांचा छोटा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांना आता घरी परतावं लागत आहे. मुनमुनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयीची माहिती दिली.

‘जर्मनीमध्ये छोटा अपघाता झाला होता. माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मी पुढचा प्रवास करू शकत नाही. मला घरी परत जावं लागतंय’, अशी पोस्ट मुनमुनने लिहिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुनमुन स्वित्झर्लंडच्या इंटरलेकन ट्रेनने जर्मनीला पोहोचली होती. या ट्रिपचे फोटो ती सतत चाहत्यांसोबत शेअर करत होती. बॉलिवूडच्या प्रसिद्ध शूटिंग डेस्टिनेशनवरूनही तिने सुंदर फोटो पोस्ट केले होते.

मुनमुन 2008 पासून ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील अनेक भूमिका आजवर बदलल्या. मात्र बबिता जी ही भूमिका सुरुवातीपासून मुनमुनच साकारत आहे. या मालिकेशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. कमल हासन यांच्या ‘मुंबई एक्स्प्रेस’ आणि 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉलिडे’ या चित्रपटात तिने काम केलं.