कधी काळी ज्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आता त्याच्याच विरोधात उभी राहणार; तब्बल 28 वर्षांनंतर तब्बू कोणासोबत काम करायला सज्ज?

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा एक चित्रपट चाहत्यांचा भेटीला येणार आहे. ज्यात ती ज्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आता त्याच्याविरोधात 28 वर्षानंतर विरोधात उभी राहणार आहे.

कधी काळी ज्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आता त्याच्याच विरोधात उभी राहणार; तब्बल 28 वर्षांनंतर तब्बू कोणासोबत काम करायला सज्ज?
tabu and nagaarjuna
| Updated on: Jul 07, 2026 | 11:57 AM

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन लवकरच त्यांच्या 100 व्या चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचे नाव ‘किंग 100’ आहे. हा चित्रपट नागार्जुनच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे आणि त्याचे काम आधीच सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात नागार्जुनसोबत तब्बू देखील दिसणार आहे. या दोघांनी शेवटचे 1998 साली आलेल्या ‘आविदा माँ आविदे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता, 28 वर्षांनंतर, नागार्जुन आणि तब्बूची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे आणि आता एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. असे वृत्त आहे की, या चित्रपटात प्रेमकथा नसून तब्बू आणि नागार्जुन एकमेकांविरुद्ध दिसणार आहे.

‘किंग 100’ च्या आधी, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि तब्बू यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तब्बू आणि नागार्जुन यांनी 1996 सालच्या ब्लॉकबस्टर ‘निन्ने पेल्लादथा’ आणि 1998 सालच्या ‘आविदा माँ आविदे’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. जवळपास तीन दशकांनंतर या जोडीचे पुनरागमन खरोखरच खास आहे. मागील दोन चित्रपटांमध्ये तब्बू आणि नागार्जुन यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती, पण यावेळी प्रेम नसून दोघांमधील संघर्ष आहे. अभिनेत्री तब्बूचे नागार्जुन वर प्रेम होते असे म्हटले जात आहे. पण त्याचे आधीच लग्न झाले होते म्हणून नंतर काही वर्षांच्या अफेअरनंतर तब्बू आणि अभिनेत्याचे रस्ते वेगळे झाले. त्यानंतर तब्बूने पुन्हा कोणत्याच व्यक्तीचा विचार केला नाही.

Loading...

नागार्जुनच्या ‘किंग 100’ बद्दल निर्मात्यांनी अद्याप जास्त काही उघड केले नसले तरी, यात तब्बू आणि नागार्जुन यांच्यात स्पर्धा असेल हे समोर आले आहे. ताज्या वृत्तांनुसार, तब्बू या चित्रपटात नागार्जुनच्या विरुद्ध मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत नकारात्मक दिसू शकते. यापूर्वी एकत्र काम केल्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येईल अशी अनेकांना अपेक्षा होती. वृत्तांनी परिस्थिती पूर्णपणे उलटवली आहे.

आर. कार्तिक दिग्दर्शित ‘किंग 100’ हा एक असा ड्रामा म्हणून ओळखला जात आहे, जो एका माणसाच्या गरिबीतून श्रीमंतीकडे झालेल्या प्रवासाची, तसेच वडील आणि मुलीच्या घट्ट नात्याची कथा दर्शवतो. अन्नपूर्णा स्टुडिओच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात नागार्जुन आणि तब्बू यांच्यासोबत सुष्मिता भट्ट एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. नागार्जुनने नुकतेच सांगितले होते की तो 10 जुलै रोजी चित्रपटाबद्दल माहिती देईल. तेव्हापासून चाहते 10 जुलैवर लक्ष ठेवून आहेत. ‘किंग 100’ चे चित्रीकरणही सुरू झाल्याचे वृत्त आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us