तनुश्री दत्ता हिचे राखी सावंत हिच्यावर खळबळजनक आरोप, लोक हैराण, थेट म्हणाली, सुपारी घेण्याचे काम

राखी सावंत ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने केलेले आरोप ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

तनुश्री दत्ता हिचे राखी सावंत हिच्यावर खळबळजनक आरोप, लोक हैराण, थेट म्हणाली, सुपारी घेण्याचे काम
| Updated on: Sep 21, 2023 | 4:55 PM

मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने पती आदिल दुर्रानी खान याच्यावर गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने केलेल्या आरोपांनंतर आदिल दुर्रानी (Adil Durrani) याला थेट जेलमध्ये राहण्याची वेळ आली. आता आदिल दुर्रानी हा जेलबाहेर आलाय. त्याने राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर सतत राखी आणि आदिल दुर्रानी हे एकमेकांवर आरोप करताना कायमच दिसतात.

आदिल दुर्रानी आणि राखी यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय. एकीकडे आदिल दुर्रानी याच्यासोबत राखी सावंत हिचा वाद सुरू असतानाच आता तनुश्री दत्ता हिने राखीवर गंभीर आरोप केले. तनुश्री दत्ता ही 2018 मध्ये MeToo चळवळीमध्ये खूप जास्त सक्रिय दिसली. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्यानंतर प्रत्येकजण हैराण झाले.

त्यावेळी राखी सावंत ही तनुश्री दत्ता हिच्यावर आरोप करताना दिसली. इतकेच नाही तर राखी सावंत हिने थेट म्हटले की, तनुश्री दत्ता ही लेस्बियन असून हिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केले. त्यावेळी राखी सावंत सतत तनुश्री दत्ता हिच्यावर आरोप करताना दिसली. आता राखी सावंत हिच्या विरोधात तनुश्री दत्ता ही मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.

तनुश्री दत्ता हिने केलेले आरोप ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. तनुश्री दत्ता म्हणाली की, राखी सावंत एक नंबरची लबाड आहे. ती सर्वकाही खोटे बोलते. इतकेच नाही तर इंडस्ट्रीच्या लोकांनी राखी सावंत हिला पाळून ठेवलंय. राखी सावंत ही तोंडी सुपाऱ्या घेण्याचे काम करते. एखाद्यावर अभिनेत्रीने आरोप केले की, त्या अभिनेत्री विरोधात बोलण्यासाठी हिला सोडले जाते.

यासाठी राखी सावंत मोठा पैसे घेत असल्याचे देखील तनुश्री दत्ताने म्हटले. पुढे तनुश्री दत्ता म्हणाली, राखी सावंत तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांवर अत्याचार करते. इतकेच नाही तर राखी सावंत हिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केलीये. तिने त्यांना त्रास दिला. माझी सुपारी राखी सावंत हिनेच घेतली. त्यावेळी तिने माझ्यावर अत्यंत चुकीचे आरोप लावले. माझ्याबद्दल ती काहीही बोलत होती. कारण तिने तगडी मोठी सुपारी घेतली.

तनुश्री दत्ता हिने थेट म्हटले की, राखी सावंत हिला मानसिक आजार आहे. तिला कोणत्याही प्रकारचा मान, प्रतिष्ठा सन्मान नाहीये ती पैशांसाठी काहीही करण्यास तयार असते. तनुश्री दत्ता हिने केलेले राखी सावंत हिच्यावरील आरोप ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आता या आरोपांवर राखी सावंत ही काय प्रतिक्रिया देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.