Tanushree Dutta : वाईट वृत्ती कायमची संपली, नानांच्या निधनावर तनुश्री दत्ता पुन्हा बरळली, महाकालचं दर्शन घेत म्हणाली…
Tanushree Dutta On Nana Patekar : तनुश्री दत्ता सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली असून अभिनेत्रीनं नाना पाटेकर यांच्या निधनावर वादग्रस्त विधान केलं आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर, तनुश्री दत्ता वादग्रस्त वक्तव्य करत आहे. तनुश्रीनं आता उज्जैनमधील महाकाल मंदिराला भेट दिल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिनं व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तनुश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘महाकाल बाबांवर माझा विश्वास आहे. त्यांनीच मला अनेक संकटातून वाचवलं आहे. नाना आणि त्यांच्या मित्रांनी केलेल्या शेकडो हल्ल्यांपासून त्यांनी माझं रक्षण केलं.’
‘माझ्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल घडल्यानंतर लगेचच महाकाल मंदिराला भेट देणं, काय योगायोग आहे! जरी मला त्यांच्या मृत्यूच्या बातमीच्या सत्यतेबद्दल अजूनही शंका असली तरी, माझी मनापासून इच्छा आणि आशा आहे की, ही वाईट वृत्ती कायमची संपली आहे. माझ्या आयुष्यातील सर्व दुष्ट शक्तीही एकेक करून नाहीशा होवोत. जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तर ज्यांनी मला त्रास दिला आहे, त्या सगळ्या दुष्ट शक्तींना संपवा.’
तनुश्री म्हणाली, ‘महादेव मी कायम तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुमची साथ अशीच माझ्यासोबत असावी एवढीच इच्छा आहे माझी. बाकीच्यांपेक्षा तुम्हाला माझ्याबद्दल जास्त माहित आहे. त्यामुळे माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा. जगातल्या वाईट वृत्तींचा नाश व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. मी त्यांची नकारात्मकता आणि चालू असलेले षडयंत्र आता आणखी सहन करू शकत नाही.’
तनुश्री दत्ताचे #MeToo आरोप काय होते?
२०१८ मध्ये, भारतातील #MeToo चळवळीदरम्यान, तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. तनुश्रीनं नानांवर २०१८ च्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान गैरवर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. तिच्या आरोपानुसार, ही घटना मुंबईतील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना घडली. तिनं असा आरोप केला की, चित्रीकरणादरम्यान नानांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. पण, नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, नाना पाटेकर यांचं गोव्यात 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून इंडस्ट्री त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे.