
मुंबई : सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट आज धमाका करताना दिसतोय. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. टायगर 3 हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. चित्रपटाची एक क्रेझ चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच बघायला मिळालीये. विशेष म्हणजे टायगर 3 हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. टायगर 3 चित्रपटातील तिसऱ्या गाण्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला.
टायगर 3 रिलीज होण्याच्या अगोदर काल सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठी विनंती केल्याचे बघायला मिळाले. आता अशी एक चर्चा आहे की, सलमान खान याचा टायगर 3 चित्रपट शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड नक्कीच मोडेल. कारण चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.
दुसरीकडे बिग बाॅस 17 च्या विकेंडच्या वारला सलमान खान आणि कतरिना कैफ हे टायगर 3 चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. यावेळी त्यांनी चित्रपटातील एक धमाकेदार डान्स देखील केला. टायगर 3 चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरणार असल्याचे सांगितले जातंय. दिवाळीच्या दिवशी टायगर 3 मोठा धमाका करेल का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
#Xclusiv… #Tiger3 advance booking status at *national chains*… Note: [Sunday] Day 1 tickets sold…
⭐️ #PVRInox: 2.19 lacs
⭐️ #Cinepolis: 52,000
⭐️ Total: 2.71 lacs tickets sold.#Tiger3 [Monday] Day 2 tickets sold…
⭐️ #PVRInox: 91,000
⭐️ #Cinepolis: 22,000
⭐️ Total: 1.13 lacs… pic.twitter.com/hQ88Qg8lNv— taran adarsh (@taran_adarsh) November 11, 2023
आज 12 नोव्हेंबर रोजी जगभरात 8,900 स्क्रीन्सवर टायगर 3 हा चित्रपट रिलीज होतोय. विदेशात देखील टायगर 3 चित्रपटाला तब्बल 3,400 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साऊथमध्ये देखील चित्रपटाला प्रतिसाद मिळू शकतो, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
तरण आदर्श यांच्या मते टायगर 3 हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 40 ते 50 कोटींची कमाई एकदम आराम करेल. आज दिवाळी असल्याने या चित्रपटाला प्रतिसाद मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला फार काही धमाका करताना आला नाही.