AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच उंदीर आला अन्…; किरण मानेंनी सांगितली 8 वर्षांपूर्वीची आठवण

Kiran Mane Post About Old Memories : अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला किस्सा त्यांनी सांगितला आहे. किरण माने यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे? वाचा सविस्तर...

नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच उंदीर आला अन्...; किरण मानेंनी सांगितली 8 वर्षांपूर्वीची आठवण
किरण माने, अभिनेतेImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 24, 2024 | 6:39 PM
Share

अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते विविध सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत असतात. किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. किरण माने यांनी एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानची आठवण या पोस्टमध्ये सांगितली आहे. अभिनेत्री अमृता सुभाष हिच्यासोबत किरण माने यांनी ‘परफेक्ट मिसमॅच’ हे नाटक केलं होतं. या नाटकाच्या प्रयोगावेळी स्टेजवर अचानकपणे उंदीर आला आणि धांदल उडाली. तेव्हा प्रसंगावधान दाखवल्याने कशी विनोद निर्मिती झाली आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकला याबाबत किरण माने यांनी पोस्ट शेअर केलीय.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी

आठ वर्षांपुर्वीची भन्नाट आठवण…

…बेकार फजिती झाली असती राव त्यावेळी. ‘परफेक्ट मिसमॅच’ नाटकाचा ठाण्यात गडकरीला प्रयोग होता. धुलीवंदनाची सुट्टी होती. जवळजवळ फुल्ल भरलेलं थिएटर.. प्रयोगही छान रंगू लागला. मी गावाकडचा सातार्‍याचा रांगडा गडी. जुन्या बिल्डींग्ज पाडणारा ब्रेकींग काॅन्ट्रॅक्टर आणि अमृता पुण्यातली हायफाय मुलगी. दोघेही एकमेकांना ‘परफेक्ट मिसमॅच’ !

अमृता रात्रीच्या निवांत वेळी ‘चांदणं पहायला’ टेरेसवर येते. तिच्या लक्षात येतं की टेरेसला लागून असलेल्या स्टोअररूममध्ये मी कुमार गंधर्वांचा नंद राग ऐकत स्काॅच पित बसलोय. माझी रांगडी-गावठी पर्सनॅलिटी आणि कुमारजी-स्काॅच हे विचित्र काॅम्बीनेशन पाहून ती चकीत होते. गप्पा मारायला बसते. बोलता-बोलता पेग भरून घेते. आणि गप्पा रंगत जातात. पेगवर पेग रिचवले जातात. दोघेही फुल्ल टल्ली होतो. असा सीन मस्त रंगात आला. हशा-टाळ्या सुरू होत्या.

एका क्षणी प्रेक्षकांतून वेगळीच कुजबूज ऐकू येऊ लागली. काही स्त्रियांच्या ‘ईईS’ अशा बारीक किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. सीनमध्ये जे सुरू होते, त्याला हा अगदीच ‘ऑड’ रिस्पाॅन्स होता. आम्ही दोघेही किंचीत काॅन्शस झालो. पण बेअरींग सोडले नाही. प्रतीक्षिप्त क्रियेनं आमचे कपडे ठिकठाक आहेत का हे आधी चेक केलं…! हुश्श !! ठीक होते. मग काय झालेय???

प्रेक्षकांतले आवाज वाढू लागले. मी त्याच बेअरींगमध्ये इकडे तिकडे पाहीलं…तर एक भला मोठ्ठाच्या मोठ्ठा उंदीर स्टेजवर आला होता… आणि त्याची नजर आमच्या सीनमध्ये ठेवलेल्या ‘चखण्या’वर होती. हळूहळू तो त्या दिशेने येत होता.

अमृताची त्या उंदराकडे पाठ होती. तिने बेअरींग न सोडता नजरेनेच मला ‘काय झाले?’ असे विचारले. मी त्याच टल्ली अवस्थेत उंदराला म्हणालो “ये ये भावा.. तुझीच कमी होती. खा चखना”.. अमृताही बेअरींग न सोडत क्षणार्धात म्हणाली “अरे आपल्याला कंपनी द्यायला हासुद्धा आला.” प्रेक्षकांतून बंपर लाफ्टर आला. उंदराने बिचार्‍याने घाबरून विंगेत एक्झीट घेतली. मी परत अमृताकडे वळत “धुलवड साजरी करायला आला आसंल” असं म्हणत सीन पुन्हा सुरू केला…

सीनही ‘लाईट’ मूडचा असल्यामुळे वेळ निभावून गेली आणि पुढे नाटक भन्नाट पार पडलं पण त्यावेळी अमृता आणि मी दोघांच्याही पोटात गोळा आला होता हे मात्र खरं… वाईट फजिती होऊन अख्ख्या प्रयोगाची वाट लागली असती तर’ या जाणीवेनं अजून अंगावर काटा येतो!

– किरण माने.

राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.