
अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. नुकतंच त्याने एक पोस्ट शेअर केलीय. यात त्याने सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.

'हिंदी शोमध्ये काम करणं म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठ्ठी संधी' असं काही मला वाटत नाही ! पण माझा 'अमोल पणशीकर' नावाचा मित्र मला कायम म्हणतो, स्वतःच कॅनव्हास मोठं कर म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही!, अशी पोस्ट कुशलने शेअर केलीय.

म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मला खरच मजा आली. खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला. नवीन मित्र मिळाले, नवीन शिकायला मिळालं, असंही कुशलन त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एक गोष्ट अनुभवली, आयुष्याला रंगत येण्यासाठी अख्खं आभाळ रंगवायची गरज नाही. माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं की, पुरेसं होतं, असं म्हणत कुशलने सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.

कुशल बद्रिके सध्या 'मॅडनेस मजायेंगे' या कॉमेडी शोमध्ये काम करत आहे. या कार्यक्रमातील कुशलच्या कामाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. याआधी 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये त्याने काम केलंय.