
‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन प्रचंड गाजतोय. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची जोरदार चर्चा आहे. अनसीन, अनदेखामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळल्या आहेत. एक्सट्रा कल्लामध्ये निक्की आणि अभिजीत चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी निक्की स्वत: ची स्तुती करताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची रुपं कोणत्याही क्षणी बदलताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्य नवा प्लॅन बनवताना काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आपली खेळी किती उत्तम आहे हे दाखवण्याचा सदस्यांचा प्रयत्न आहे. निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंतची जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आता अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अभिजीतसोबत बोलताना निक्की त्याला तिची मतं सांगते. तुला माहिती आहे ना जंगलाचा राजा एकटा बसतो आणि बाकीचे प्राणी नेहमी सोबत असतात. कारण ते राजासमोर एकटे जाऊ शकत नाहीत. निसर्गाची ही पॉलिसी आहे. गौतम गुल्हाटीच्या सीझनमध्ये सगळे जण त्याच्या विरोधात होते. पण तरीही तो त्या सीझनचा विजेता झाला. कारण घरातले सीन लोक त्यांच्या नजरेने पाहतात. पण प्रेक्षकांची नजर मात्र वेगळी असते. मी चुकीची नाही हे सांगण्याची मला गरज वाट नाही, असं निक्की म्हणताना दिसत आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरातील सदस्यांना दिलेल्या जोड्यांमध्येच फिरण्याचा आदेश बिग बॉसने दिला आहे. पण अभिजीत सावंत एकटा फिरत असल्याचं दिसतं. त्यावर सूरज त्याला अभिदादा आत बस, असं म्हणतो. तर तितक्यात छोटा पुढारी अभिजीतला जोडीशिवाय फिरू शकत नाही, असं म्हणतो. त्यावर अभिजीत म्हणतो की, मला बोलतील बिग बॉस… त्यावर घन:श्याम त्याला उत्तर देतो. पण तुम्ही नियम मोडू नका, असं घन: श्याम म्हणतो. तुम्ही तुमचे शब्द बोलताय की निक्कीचे. दोन दिवसांत अभिजीत सावंत पू्र्णपणे बदलला आहात, असं आर्या अभिजीत म्हणताना या दिसत आहे. एकूणच काय तर बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील मैत्री, वाद अन् भांडणं चर्चेचा विषय ठरत आहेत.
अनसीन, अनदेखामध्ये निक्कीचा अभिजीतला सल्ला देते. निक्की अभिजीतला प्रामणिक राहण्याबाबत बोलते. मी तुला जे सांगते ते उद्या तुझ्या ग्रुपमध्ये जाऊन सांगायचं नाही. एक मित्र म्हणून मी तुला सांगत असते. माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. उद्या जाऊन धोका देऊ नकोस. आपल्यातला जो कॅप्टन बनेल तो सुटेल. पण जर ते कॅप्टन झाले तर पहिलं किचन घ्यायचंय. दुसरं तुला तुझा पायाचा स्टेटस बघावा लागेल. कारण कोणी कोणावर ड्युटी थोपवू शकत नाही, असं निक्की अभिजीतला सांगते.