असीम रियाज आणि अली गोनी उमराह करण्यासाठी पोहचले, फोटो व्हायरल

असीम रियाज आणि अली गोनी कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एका पार्टीतील खास व्हिडीओ अली गोनी याचा व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अली गोनी हा जास्मिन हिच्यासोबत डान्स करताना दिसला होता. अली आणि जास्मिन लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

असीम रियाज आणि अली गोनी उमराह करण्यासाठी पोहचले, फोटो व्हायरल
| Updated on: Mar 24, 2023 | 3:08 PM

मुंबई : असीम रियाज याने बिग बॉस सीझन 13 (Bigg Boss 13) मध्ये जबरदस्त आणि धमाकेदार गेम खेळला. विशेष म्हणजे बिग बॉस 13 नंतर असीम रियाज याला खास ओळख मिळाली. त्याच्या फॅन फाॅलोइंगमध्येही (Fan following) मोठी वाढ झाली. बिग बॉस 13 च्या सुरूवातीला सिध्दार्थ शुक्ला आणि असीम रियाज यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळाली. मात्र, पुढे असीम रियाज आणि सिध्दार्थ शुक्ला यांच्यामध्ये बिग बॉस 13 मध्ये मोठे वाद झाले. रश्मी देसाई यांच्या वादाचे कारण असल्याचे सांगितले जायचे. बिग बॉस (Bigg Boss) 13 चे सीजन टीआरपीमध्ये टाॅपला राहिले आहे.

असीम रियाज आणि अली गोनी हे दोघे खास मित्र आहेत. अली गोनी हा देखील बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून अली गोनी हा टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन हिला डेट करत आहे. बिग बॉस 14 मध्ये जास्मिनसाठी अली गोनी हा सहभागी झाला होता. राहुल वैद्यसोबत अली गोनी याची खास मैत्री झाली होती.

आता सोशल मीडियावर असीम रियाज आणि अली गोनी यांचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो विमानामधील आहे. हा फोटो सर्वात अगोदर असीम रियाज याने सोशल मीडियावर शेअर केले होता. आता हा फोटो व्हायरल होत असून या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये असीम रियाज आणि अली गोनी विमानात बसलेले दिसत आहेत. उमराहच्या कपड्यांमध्ये अली आणि असीम दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना असीम रियाज याने चाहत्यांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो शेअर करताना असीम रिलीज याने लिहिले की, रमजान मुबारक हो, अल्लाह हू अकबर…अली आणि असीम यांचे फोटो काही चाहत्यांना आवडले नसल्याचे दिसत आहेत. या फोटोमुळे अली खान असीम हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे देखील दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी टिव्ही अभिनेत्री हिना खान ही देखील मक्का येथे पोहोचली होती. हिना खान हिने तिच्या आयुष्यातील पहिला उमराह केला आहे. यावेळी हिना खास हिने हाॅटेलमधील काही फोटो शेअर केले आहेत. हिजाबमध्ये हिना खान दिसत होती. मात्र, हिना खान हिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.