Bigg Boss 16 | अखेर प्रियंका आणि अर्चनाच्या मैत्रीत फूट, वाचा वादाचे कारण

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात प्रियंका आणि अर्चना यांच्यात चांगली मैत्री दिसत होती.

Bigg Boss 16 | अखेर प्रियंका आणि अर्चनाच्या मैत्रीत फूट, वाचा वादाचे कारण
| Updated on: Oct 28, 2022 | 10:40 AM

मुंबई : बिग बॉसचे घर असे आहे की, तिथे कोण कधी कोणाचा मित्र आणि शत्रू होईल हे सांगणे थोडे कठिणच आहे. बिग बाॅसकडून घरातील सदस्यांसाठी टास्क दिले जातात. यादरम्यान मित्र देखील शत्रू होतात. घरातील कामामुळे देखील सदस्यांमध्ये वाद होऊन मोठा हंगामा होतो. फार काळ बिग बाॅसच्या घरात कोणतीच मैत्री टिकत नाही. सध्या बिग बाॅसच्या घरातील अनेक सदस्य शोमध्ये जास्त काळ टिकण्यासाठी लव्ह अॅंगल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये साैंदर्या आणि गाैतमचे नाव आघाडीवर आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात प्रियंका आणि अर्चना यांच्यात चांगली मैत्री दिसत होती. मात्र, नुकताच दोघींमध्ये कडाक्याची भांडणे झाली आहेत. या दोघींमधील वाद पाहून घरातील जवळपास सर्वच सदस्यांना आनंद झाला. कारण गेल्या काही दिवसांपासून अर्चना प्रियंकाचे ऐकून घरातील सदस्यांना सतत टार्गेट करत होती.

अर्चना प्रियंकाच्या तालावर नाचत होती. प्रियंकाने अर्चनाला आपला प्यादा म्हणून तयार केले असून अर्चनाच्या मागून प्रियंका गेम खेळत आहे. मात्र, दोघींमध्ये जोरदार भांडणे किचनमध्ये झाली आहेत. अर्चना घरातील सदस्यांसाठी जेवण तयार करत होती. यादरम्यान प्रियंका किचन साफ करताना हा वाद सुरू झाला.

प्रियंकाने पोळ्या करण्यासाठी ज्या भांड्यामध्ये पाणी घेतले होते, ते अर्चनाला पटले नाही. मग काय यावरून दोघींनी बऱ्याच वेळ भांडणे केली. रागा रागात प्रियंका किचनमधून बाहेर जाते आणि घरातील सदस्यांना म्हणते की, जोपर्यंत अर्चना किचनच्या बाहेर जाणार नाही, तोपर्यंत मी पोळ्या करणार नाही. मात्र, काही वेळाने दोघी परत चांगले बोलताना दिसल्या.