नीता अंबानी यांना साडी नेसून देणाऱ्याचा पगार किती असावा?

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Oct 28, 2022 | 9:23 PM

नीता अंबानी त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. कोणताही कार्यक्रम असो सर्वांच्या नजरा या नीता अंबानीकडे असतात.

नीता अंबानी यांना साडी नेसून देणाऱ्याचा पगार किती असावा?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. डिझायनर साड्या, लेहेंगे आणि दागिन्यांचे खास कलेक्शन नीता अंबानी यांच्याकडे आहे. नीता अंबानी त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. कोणताही कार्यक्रम असो सर्वांच्या नजरा या नीता अंबानी यांच्याकडे असतात. लग्नामध्ये आणि पार्ट्यामध्ये अनेकदा नीता अंबानी यांना साडीमध्ये बघितले गेले आहे. नीता यांचे अनेक साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात.

नीता अंबानी यांच्या डिझायनर साड्याच फक्त करोडो रूपयांच्या नसून साडी घालून देण्यासाठी देखील नीता अंबानी खूप मोठी रक्कम मोजतात. डॉली जैन नीता अंबानीला साडी घालून देण्यासाठी मोठी फी घेते. फक्त नीता अंबानीच नाही तर बाॅलिवूडमधील अनेक अभिनेत्री या डॉली जैनकडूनच साड्या घालून घेतात.

एक अशी चर्चा आहे की, नीता अंबानी फक्त डॉली जैनकडूनच साडी घालून घेतात. विशेष म्हणजे नीता अंबानी स्वत: कधीच साडी घालत नसून दरवेळी डॉली जैनच त्यांना साडी नेसून देते. एका वेळी साडी घालण्यासाठी नीता अंबानी यांच्याकडून डॉली जैन बक्कळ फी घेत असून हा फीचा आकडा ऐकल्यावर नक्कीच तुमचे डोळे विस्फारतील.

अशी एक चर्चा आहे की, एका वेळी साडी घालून देण्यासाठी नीता अंबानी डॉली जैनला तब्बल 15 ते 20 लाख रूपये देतात. मात्र, याबद्दल अजून पूर्णपणे स्पष्टता नाहीये. पण हे नक्की की, साडी घालण्यासाठी नीता अंबानी मोठी रक्कम मोजतात.

डॉली जैन साडी नेसून देण्यात माहीर आहे. एकच साडी डॉली जैन 325 वेगवेगळ्या घालून देते. डॉली जैनने अनेक चित्रपटामध्ये अभिनेत्रींना साड्या नेसून दिल्या आहेत. विशेष म्हणजे एकदम फास्ट डॉली जैन साडी नेसून देते. राजकारणी महिला असो किंवा अभिनेत्री सर्वांनीच डॉली जैनकडून साड्या नेसून घेतल्या आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI