Bigg Boss 16 | ‘सलमान खान’चा सुंबुल आणि अंकितवर चढला पारा, म्हणाला की…

यंदाच्या सीजनच्या अगोदर इमली अर्थात सुंबुल ताैकीरच्या नावाची सुरूवातीपासूनच प्रचंड अशी चर्चा होती.

Bigg Boss 16 | सलमान खानचा सुंबुल आणि अंकितवर चढला पारा, म्हणाला की...
Salman khan
| Updated on: Oct 29, 2022 | 8:55 AM

मुंबई : बिग बॉस 16 ची गेल्या सीजनच्या तुलनेत नक्कीच चांगली सुरूवात झालीये. टीआरपीमध्येही शो वरचढ ठरतोय. यंदा बिग बाॅसने शोसाठी खास मेहनत घेतलीये. राशनसाठी घरातील सदस्यांना दरवेळी टास्क दिले जात आहेत. यंदाच्या सीजनच्या अगोदर इमली अर्थात सुंबुल ताैकीरच्या नावाची सुरूवातीपासूनच प्रचंड अशी चर्चा होती, मात्र बिग बाॅसच्या घरात गेल्यानंतर इमली फक्त आणि फक्त शालिनच्या मागे पुढे फिरताना आणि रडताना दिसत आहे.

बिग बॉस 16 च्या घरातील सर्व सदस्यांमध्ये निर्मात्यांनी सुंबुल हिला सर्वाधिक मानधन दिले आहे. मात्र, बिग बाॅसच्या घरात इमली काहीच करताना दिसत नाहीये. सुंबुलच्या चाहत्यांना देखील वाटले होते, की बिग बाॅसच्या घरात सुंबुल धडाकेबाज गेम खेळेल. परंतू, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याने सुंबुलचे चाहते देखील नाराज झाले आहेत.

सुंबुल चुकीचा गेम खेळत आहे, हे सांगण्यासाठी स्वत: सुंबुलचे वडील बिग बाॅसच्या मंचावर आले होते. वडिलांनी सर्व गोष्टी सांगूनही सुंबुलने आपला खेळ सुधारला नाहीये. सलमान खानने परत एकदा विकेंडच्या वारमध्ये सुंबुलचा क्लास घेतला. यावेळी सुंबुलला अनेक गोष्टी सलमान खान याने सुनावल्या आहेत.

अंकित गुप्ता देखील बिग बाॅसच्या घरात काही खास काम करत नसल्याचे सलमान खान म्हणाला. यावेळी प्रियंकालाही अनेक प्रश्न सलमान खानने विचारले. तू घरात काहीच करत नसल्याचे देखील सलमान खान अंकितला म्हणाला. यावेळी सलमान खानने अब्दूचे काैतुक केले. दोन दिवसांपूर्वी अर्चना अब्दूला भडकवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावर सलमान खान बोलताना दिसला.