AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs CAN : Ibrahim Zadran ची ऐतिहासिक खेळी, कॅनडा विरुद्ध अफगाणिस्तानचं द्विशतक

Afghanistan vs Canada : अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील आपल्या शेवटच्या सामन्यात जाता जाता मोठा विक्रम केला आहे. तसेच इब्राहीम झाद्रान याने महारेकॉर्ड केला आहे.

AFG vs CAN : Ibrahim Zadran ची ऐतिहासिक खेळी, कॅनडा विरुद्ध अफगाणिस्तानचं द्विशतक
Ibrahim Zadran Afghanistan vs CanadaImage Credit source: @ACBofficials X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 19, 2026 | 10:23 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 39 व्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध कॅनडा आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचं या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजय मिळवून मोहिमेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. अफगाणिस्तानने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तसेच अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज इब्राहीम झद्रान याने महारेकॉर्ड केलाय. अफगाणिस्तान टीम आणि इब्राहीम झद्रान या दोघांनी काय केलंय हे सविस्तर जाणून घेऊयात.

अफगाणिस्तानची टी 20i वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या

इब्राहीम अफगाणिस्तानसाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वात मोठी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इब्राहीमने याबाबत रहमानुल्लाह गुरुबाज याचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच अफगाणिस्तानची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 200 धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. अफगाणस्तानची याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 190 ही सर्वोच्च धावसंख्या होती. अफगाणिस्तानने 2021 च्या टी 20i वर्ल्ड कप मध्ये स्कॉटलंड विरुद्ध 4 विकेट्स गमावून 190 धावा केल्या होत्या.

रहमानुल्लाह गुरुबाज रेकॉर्ड ब्रेक

इब्राहीमने केलेल्या नाबाद 95 धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. इब्राहीमने 56 बॉलमध्ये 95 धावा केल्या. इब्राहीमने 85 धावा करताना इतिहास घडवला. इब्राहीमने रहमानुल्लाह गुरुबाज याला मागे टाकत अफगाणिस्तानसाठी टी 20i वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज हा बहुमान मिळवला. रहमानुल्लाहने याच वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 84 धावांची खेळी केली. उभयसंघातील हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यांनतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजेता ठरला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात केली होती.

अफगाणिस्तानचं साखळी फेरीत पॅकअप

दरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट टीमने गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र अफगाणिस्तानचं यंदा दुर्देव असं की त्यांचा साखळी फेरीतच बाजार उठला. अफगाणिस्तानने आतापर्यंत साखळी फेरीत 3 फेरीत एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या मोहिमेचा शेवटचा विजयाने करण्यात यशस्वी ठरणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप