Bigg Boss 16 | सलमान खान याच्या बोलण्यानंतर टीना दत्ता झाली भावूक

टीना बिग बाॅसच्या घरात शालिन भनोटसोबत गेम खेळत असून हे नाते फेक असल्याचे अनेकांना वाटत आहे.

Bigg Boss 16 | सलमान खान याच्या बोलण्यानंतर टीना दत्ता झाली भावूक
| Updated on: Dec 04, 2022 | 6:03 PM

मुंबई : बिग बाॅसच्या घरात टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्या नात्यामध्ये एक वेगळे वळण आले आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान शालिनला म्हणतो की, तू फक्त टीनाच्या मागे फिरत असून तिच्या काही गोष्टी ऐकण्यामध्ये तुझा गेम खराब करत आहेस. इतकेच नाही तर घरातील अनेक सदस्यांना देखील हेच वाटत आहे की, टीनामुळे शालिनचा गेम खराब होतोय. टीना बिग बाॅसच्या घरात शालिन भनोटसोबत गेम खेळत असून हे नाते फेक असल्याचे अनेकांना वाटत आहे.

विकेंड वारनंतर टीना शालिन भनोट याला समजावते की, सर्वांना वाटत आहे की, माझ्यामुळे तुझा गेम खराब होतोय. तर आपण दोघे आता थोडे दूर राहूयात. मी तुझ्यापासून थोडे दूर राहण्याचा प्रयत्न करणार आहे.

टीना शालिनला हे सर्व समजवण्याचा खूप जास्त प्रयत्न करते. परंतू शालिन हे ऐकायला तयार नाही. शालिन म्हणतो की, आपले रिलेशन हे गाैतम आणि साैंदर्यासारखे नक्कीच फेक नाहीये.

यावेळी शालिन टीनाला समजवण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो. परंतू टीना शालिनला म्हणत आहे की, मी तुझी काळजी करते, तूला चांगले बोलते याचा बाहेर वेगळा अर्थ काढला जातोय. जे चुकीचे आहे.

बिग बाॅसने एक टास्क घरातील सदस्यांना दिला होता. त्यामध्ये त्यांना घरात असलेल्या सदस्यांपैकी कोणता असा सदस्य आहे, जो घरामध्ये राहण्याच्या लायक नाहीये ते सांगावे. यावेळी सर्वजण शालिनचे नाव घेतात.

सलमान खान याने अर्चना गाैतम हिचा देखील क्लास लावला. काही दिवसांपूर्वी अर्चनाने घरातील सदस्य जेवत असताना त्यांच्या ताटामधील चपाती घेतली होती. यावरून सलमान खान तिला अनेक गोष्टी बोलताना दिसला.