अंकित गुप्ता आणि प्रियंका चाैधरी यांच्यामध्ये वाद, अभिनेत्याने दिली मोठी धमकी

शालिनच्या प्रोटीनचा विषय जास्त वाढू नकोस, असे अंकितचे म्हणणे होते. प्रियंका अंकितचे न ऐकता प्रोटीनच्या विषयावरून टार्गेट करत शालिनला भांडते.

अंकित गुप्ता आणि प्रियंका चाैधरी यांच्यामध्ये वाद, अभिनेत्याने दिली मोठी धमकी
| Updated on: Nov 03, 2022 | 9:34 AM

मुंबई : बिग बाॅसच्या घरात कधी काय होईल याचा अजिबातच नेम नाही. असेच चित्र सध्या बिग बाॅस 16 मध्ये बघायला मिळत आहे. प्रियंका चाैधरी आणि अंकित गुप्तामध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. ही भांडणे शालिनसोबत प्रियंका भांडत असताना सुरू झाली. शालिनच्या प्रोटीनचा विषय जास्त वाढू नकोस, असे अंकितचे म्हणणे होते. मात्र, प्रियंका अंकितचे न ऐकता प्रोटीनच्या विषयावरून टार्गेट करत शालिनला भांडते. यावर अंकित सतत प्रियंकाला असे करू नको म्हणतो. मात्र, यानंतर प्रियंका आपल्या मोर्चा अंकितकडे वळवते आणि तू माझ्यासोबत कधीच उभा राहत नसल्याचे ती अंकितला म्हणते.

गाॅर्डन परिसरात प्रियंका आणि अंकितमध्ये वाद झाल्यानंतर प्रियंका रागात बेडरूममध्ये जाते. यावेळी अंकित तिच्याजवळ जातो. त्यावेळी प्रियंका अंकितला म्हणते की, मी तुझ्यासाठी नाही, तू माझ्यासाठी नाहीस…प्रियंकाचे हे बोलणे ऐकून अंकित म्हणतो की मला तुझ्याकडून कोणतीही अपेक्षाच मुळात नाहीये. अंकित म्हणतो की, मी तुझ्या कॅमेऱ्यासमोर पोल उघडू?

अंकितचे हे बोलणे ऐकल्यावर प्रियंकाचाही पारा चांगलाच चढतो आणि ती म्हणते की, तू मला ब्लॅकमेल करतोस का? मी पण तुझी पोल खोलते मग…अंकित प्रियंकाला म्हणतो की, तू एकदम घटिया आहेस…प्रियंकाही अंकिता घटिया असल्याचे म्हणते. यावरून सर्वांनाच एक गोष्ट कळाली की, जेवढे सुंदर यांचे नाते दाखवले जाते, तेवढे नाहीये. अनेक राज यांच्या नात्यामध्ये आहेत. प्रेक्षकांना प्रियंका आणि अंकितची भांडणे अजिबात आवडली नाहीयेत.