Bigg Boss 16 साठी सलमान खानचा हट्ट; तिप्पट मानधन वाढवण्याच्या मागणीवर ठाम? रक्कम पाहून डोळे विस्फारतील!

गेल्या काही सिझन्समध्ये सलमानला अपेक्षित अशी मानधनातील वाढ मिळाली नव्हती. म्हणून यावेळी तो तिप्पट मानधनावर ठाम असल्याचं म्हटलं जातंय. जर त्याची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तो ऑफरला थेट नकार देणार असल्याचंही समजतंय.

Bigg Boss 16 साठी सलमान खानचा हट्ट; तिप्पट मानधन वाढवण्याच्या मागणीवर ठाम? रक्कम पाहून डोळे विस्फारतील!
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 6:45 PM

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. बिग बॉसच्या सोळाव्या (Bigg Boss 16) पर्वाविषयी सध्या विविध चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. या नव्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात इथपासून ते सूत्रसंचालक सलमान खानच्या (Salman Khan) मानधनापर्यंत अनेक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉस या शोची लोकप्रियता पाहता सलमानने पुन्हा एकदा नव्या सिझनसाठी फी वाढवल्याचं म्हटलं जातंय. यावेळी त्याने थोडथोडकं नाही तर तीन पटींनी आपली फी वाढवल्याचं कळतंय. बिग बॉससारख्या वादग्रस्त शोचं सूत्रसंचालन करणे काही सोपं काम नाही. वीकेंड का वार या खास एपिसोडमध्ये सलमानला बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातील स्पर्धकांशी संवाद साधावा लागतो. यावेळी कधी त्याला स्पर्धकांचे कान टोचावे लागतात तर कधी प्रेमाने त्यांना समजवावं लागतं.

‘टेलीचक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमानने बिग बॉस 15च्या मानधनापेक्षा तीन पटींनी अधिक मानधन मागितलं आहे. गेल्या काही सिझन्समध्ये सलमानला अपेक्षित अशी मानधनातील वाढ मिळाली नव्हती. म्हणून यावेळी तो तिप्पट मानधनावर ठाम असल्याचं म्हटलं जातंय. जर त्याची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तो ऑफरला थेट नकार देणार असल्याचंही समजतंय. सलमानने बिग बॉस 15 च्या एका एपिसोडसाठी जवळपास 15 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. संपूर्ण सिझनसाठी त्याला सुमारे 350 कोटी रुपये मिळाले होते. आता सोळाव्या सिझनसाठी त्याने 1050 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

पहा व्हिडीओ-

बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात याचाही अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. अर्जुन बिजलानी, मुनव्वर फारुखी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टिना दत्ता, अझमा फलाल, शिवम शर्मा, जय दुधाणे, मुनमुन दत्ता, जन्नत झुबैर, फैसल शेख, आरुषी दत्ता, पूनम पांडे, झैन दरबार या नावांची चर्चा आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षी बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.