‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Mar 13, 2022 | 12:18 PM

'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) या रिअॅलिटी शोचा विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि उपविजेती अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

इंडियन आयडॉल 12 फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?
Pawandeep Rajan and Arunita Kanjilal
Image Credit source: Instagram
Follow us on

‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) या रिअॅलिटी शोचा विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि उपविजेती अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. एका म्युझिक अल्बमसाठी शूट करण्यास आणि त्यांचं प्रमोशन करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघं अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी M/s ऑक्टोपस एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडने ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’शी संपर्क साधला. त्यांनी यावेळी असं सांगितलं की M/s सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने इंडियन आयडॉल 2021 चे विजेते पवनदीप आणि अरुणिता यांच्या गायनासाठी त्यांच्याशी करार केला होता. 20 गाण्यांच्या रोमँटिक अल्बमसाठी हा करार केला होता. पवनदीप आणि अरुणिता हे शोचे विजेते होण्याआधीच हा करार झाला होता. मात्र गायकांनी एका गाण्याच्या शूटिंगनंतर निर्मात्यांशी सहकार्य केला नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

पवनदीप आणि अरुणीता यांच्याशी झालेल्या करारानुसार, “सोनीने दोन्ही कलाकारांकडून अल्बमचं काम करून घेण्याचं मान्य केलं होतं आणि ते इंडियन आयडॉलचे विजेते होण्यापूर्वीच करार झाला होता. त्यांच्या सदस्याने बरेच पैसे खर्च करून पत्रकार परिषदेत अल्बम लॉन्च करण्याची घोषणा केली होती. परंतु कलाकारांनी एका गाण्याच्या शूटिंगनंतर निर्मात्यांना सहकार्य केलं नाही. आधी अरुणीता आणि त्यानंतर पवनदीपने सोनीच्या कराराला न जुमानता शूटिंगमध्ये आणि गाण्याच्या प्रमोशन आणि रिलीजसाठी निर्मात्यांना सहकार्य करणं थांबवलं.

जेव्हा सोनीला याबाबत कळवलं गेलं तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांनी कलाकारांना पाठिंबा दिला आणि जेव्हा IMPPAने सोनीकडून स्पष्टीकरण मागितलं तेव्हा सोनीची ही विशिष्ट कंपनी IMPPAची सदस्य नसून सोनीच्या इतर कंपन्या आहेत असे सांगून त्यांनी कारवाई करण्यास नकार दिला. ते म्हणाले की ही कंपनी केवळ चित्रपट, वेब सीरिज तसंच मालिकांच्या बाबतीत निर्माता-सदस्यांशी व्यवहार करते. त्यामुळे निर्मात्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती IMPPAने केली आहे. त्याचसोबत कलाकारांनी कराराप्रमाणे त्यांचं काम पूर्ण करावं, असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा:

पवनदीप-अरुणिता खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेयत? पाहा आदित्य नारायण काय म्हणाला…

शेवटी पवनदीप राजनने करुन दाखवलं ! पाच स्पर्धकांना मागे टाकत ठरला इंडियन आयडॉल