indian idol 12 winner | शेवटी पवनदीप राजनने करुन दाखवलं ! पाच स्पर्धकांना मागे टाकत ठरला इंडियन आयडॉल

Indian Idol 12 च्या बाराव्या सिझनचा विनर शेवटी जाहीर करण्यात आलाय. Indian Idol 12 व्या सिझनची ट्रॅफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत.

indian idol 12 winner | शेवटी पवनदीप राजनने करुन दाखवलं ! पाच स्पर्धकांना मागे टाकत ठरला इंडियन आयडॉल
pawandeep-indian-idol-12-winner

मुंबई : Indian Idol 12 च्या बाराव्या सिझनचा विनर शेवटी जाहीर करण्यात आलाय. Indian Idol 12 व्या सिझनची ट्रॉफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे. (Pawandeep Rajan won Indian Idol 2021 trophy defeated 5 contestants)

सहा स्पर्धकांमध्ये चुरस 

या कार्यक्रमाचे परिक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायलन सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व पाच स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12 व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे पवनदीपचे संपूर्ण भारतभरातून स्वागत केले जात आहे.

महाराष्ट्राची सायली तिसऱ्या क्रमांकावर

मागील वर्षभरापासून इंडियन आयडॉल हा गायनाचा शो सुरु होता. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाला संपूर्ण भारतभरातून पसंदी मिळाली. सोशल मीडिया, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत आली आहे. मागील वर्षभरापासून गायन क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी अनेकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर शेवटच्या सहा स्पर्धकांमध्ये आज चुरस रंगली. यामध्ये पवनदीपने बाजी मारली. तरु दुसऱ्या स्थानी अरुणिताने बाजी मारली. महाराष्ट्रच्या सायली कांबळेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पहिला क्रमांक – पवनदीप राजन (विजेता)

दुसरा क्रमांक- अरुणीता

तिसरा क्रमांक- सायली

चौथा क्रमांक- मोहम्मद दानिश

पाचवा क्रमांक- नेहाल

सहावा क्रमांक- षण्मुखप्रिया

इतर बातम्या :

Happy Independence Day : भारत-पाक युद्धात नेमकं काय झालं?, या युद्धावर बनलेले ‘हे’ 5 चित्रपट पाहाच

Happy Birthday Ayan Mukerji | दोनच चित्रपटात सुपरहिट ठरला आयन मुखर्जी, रणबीर कपूरशी आहे खास नाते!

Rashami Desai : रश्मी देसाईचं बाथरुममध्ये शूट, फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

(Pawandeep Rajan won Indian Idol 2021 trophy defeated 5 contestants)

Published On - 12:32 am, Mon, 16 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI