Happy Birthday Ayan Mukerji | दोनच चित्रपटात सुपरहिट ठरला आयन मुखर्जी, रणबीर कपूरशी आहे खास नाते!

अयान मुखर्जी (Ayan Mukerji) हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. अयानने अतिशय कमी वेळात आपली खास ओळख निर्माण केली आहे. अयानने लहान वयातच दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि आज त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.

Happy Birthday Ayan Mukerji | दोनच चित्रपटात सुपरहिट ठरला आयन मुखर्जी, रणबीर कपूरशी आहे खास नाते!
अयान मुखर्जी

मुंबई : अयान मुखर्जी (Ayan Mukerji) हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. अयानने अतिशय कमी वेळात आपली खास ओळख निर्माण केली आहे. अयानने लहान वयातच दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि आज त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.

अयानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांना दिग्दर्शनात मदत केली. यानंतर, अयानने करण जोहरला ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटासाठी मदतही केली. चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर, अयानला समजले की, तो स्वतः देखील चित्रपट दिग्दर्शित करू शकतो.

पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट!

यानंतर, अयानने 2009 मध्ये पहिला चित्रपट केला. त्यावेळी अयान 26 वर्षांचा होता आणि या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य अभिनेता होता. रणबीर आणि अयान खूप चांगले मित्र आहेत. या चित्रपटाचे नाव ‘वेक अप सिड’ होते, ज्याला बॉक्स ऑफिस आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली होती. या चित्रपटासाठी अयानला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

‘ये जवानी है दिवानी’ने केली कमाल

यानंतर, 2013 मध्ये अयानने ‘ये जवानी है दिवानी’ हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट बनवला. या चित्रपटाला केवळ समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला नाही, तर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही केली. रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. ब्रेकअपनंतर रणबीर आणि दीपिकाने या चित्रपटात एकत्र काम केले. या दोघांच्या केमिस्ट्री चाहत्यांना चित्रपटात खूप आवडली होती.

‘ब्रह्मास्त्र’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अयानचे दिग्दर्शक म्हणून 2 चित्रपट रिलीज झाले असले, तरी त्याने या 2 चित्रपटांमधूनच आपले खास स्थान निर्माण केले आहे. आता तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत. चाहते बऱ्याच काळापासून चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीर या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.

प्रत्येक चित्रपटात रणबीर हवाच!

अयान प्रत्येक चित्रपटात रणबीर कपूरला मुख्य अभिनेता म्हणून घेतो. आतापर्यंत त्याचे 2 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि रणबीर कपूर आगामी चित्रपटात देखील झळकणार आहे. दोघे मिळून खूप धमाल करत असतात. एवढेच नाही तर दोघेही प्रत्येक सुख-दु:खात देखील एकमेकांच्या पाठीशी उभे असतात.

हेही वाचा :

भांगडा गीत गाणारा समूह पाहिला आणि ‘ये देश है वीर जवानोंका’ची कल्पना सुचली! वाचा मनोरंजक किस्सा…

एका ‘आंधी’ने बदललं अभिनेत्री राखी यांचं आयुष्य, कैक वर्षांनी समोर आल्यावर ओळखणंही झालंय कठीण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI