Anjali Arora Video: ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक? सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये अंजली अरोरा दिसत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. अंजलीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Anjali Arora Video: कच्चा बदाम फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक? सोशल मीडियावर चर्चा
Anjali Arora Video: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक?
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 6:09 PM

‘कच्चा बदाम’ (Kaccha Badam) या सोशल मीडियावर गाजलेल्या गाण्यावर डान्स करत नेटकऱ्यांना वेड लावणारी अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंजलीचा कथित एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याचा दावा केला जात आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये अंजली अरोरा दिसत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. अंजलीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. लीक झालेल्या एमएमएसमध्ये (MMS) अंजलीच असल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही.

‘कच्चा बदाम’वरील डान्समुळे मिळाली प्रसिद्धी

अंजली अरोराला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाली. ‘काच्चा बदाम’वर डान्स करत तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्यामुळे ती रातोरात स्टार झाली. इन्स्टाग्रामवर तिचे 11 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यानंतर ती एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली. या शोमध्ये अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला. इतकंच नव्हे तर अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

अंजली अरोरा सध्या डिजिटल क्रिएटर आकाश संसनवालला डेट करत आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, आकाश तिच्यासाठी खूप खास आहे. अंजलीला आता ‘बिग बॉस’तीही ऑफर मिळाल्याचीही चर्चा आहे. व्हायरल व्हिडीओच्या चर्चांदरम्यान नुकतीच अंजली मुंबई एअरपोर्टवर पहायला मिळाली. सय्यां दिल में आना रे या तिच्या गाण्याच्या लाँचिंगसाठी ती मुंबईत पोहोचली आहे. तिचं हे गाणं बुधवारी 12 वाजता प्रदर्शित होणार आहे.