“गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन”, अपघातानंतर शहाणपण, कच्चा बदाम स्टार भुबन बड्याकारचा माफीनामा

कच्चा बदाम या गाण्यावर हजारो रील्स बनवले गेले. पण प्रसिद्धी मिळाल्यावर माणूस बदलतो. तसं या गाण्यला प्रसिद्धी मिळाल्यानंतर भुबनमध्येही बदल झाला आणि आता आपण शेंगदाणे विकणार नसल्याचं म्हटलं. पण आता माफी मागत त्याने आपलं विधान मागे घेतलं आहे

गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन, अपघातानंतर शहाणपण, कच्चा बदाम स्टार भुबन बड्याकारचा माफीनामा
कच्चा बदाम स्टार भुबन बड्याकार
आयेशा सय्यद

|

Mar 12, 2022 | 10:40 AM

मुंबई : सोशल मीडियाने (Social Media) सध्या अनेकांना स्टार केलंय. तुमचं एक रील, एक गाणं तुम्हाला एका रात्रीत हिरो करू शकतं. असंच काहीसं झालं भुबन बड्याकारबाबत (Bhuban Badyakar)… शेंगदाणे विकणारा एक साधा माणूस एका गाण्यामुळे रातोरात स्टार झाला.ते गाणं म्हणजे ‘कच्चा बदाम(Kaccha Badam)… हे गाणं ऐकलं नाही, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या गाण्यावर हजारो रील्स बनवले गेले. पण प्रसिद्धी मिळाल्यावर माणूस बदलतो. तसं या गाण्यला प्रसिद्धी मिळाल्यानंतर भुबनमध्येही बदल झाला आणि आता आपण शेंगदाणे विकणार नसल्याचं म्हटलं. पण आता माफी मागत त्याने आपलं विधान मागे घेतलं आहे.

“शेंगदाणे विकणार नाही”

रातोरात स्टार झाल्यानंतर भुबनने एक विधान केलं. “मी शेंगदाणे विकणार नाही”. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. “मी आता शेंगदाणे विकणं बंद केलंय, मला आता मला अभिनय क्षेत्रात यायचं आहे. मी आता सेलिब्रिटी झालो आहे. मी सेलिब्रिटी म्हणून शेंगदाणे विकायला गेलो तर मला अपमानाला सामोरे जावं लागेल. माझ्या शेजाऱ्यांनीही मला बाहेर जाऊ नकोस असं सांगितलंय, अन्यथा कुणी माझे अपहरण करेल”, असं भुबन म्हणाला होता. त्याच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली. स्टारडममुळे भुबन बदलला असल्याचं अनेकांचं म्हणण होतं.

भुबनचा माफीनामा

भुबनने आता या आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. “कच्चा बदाम हे गाणं हिट झालं याचा मला अजिबात गर्व नाही. पण मला आता कळलंय की मी त्यावेळी असं बोलायला नको होतं. लोकांनी मला सेलिब्रेटी बनवलं. पण जर गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन”, असं भुबन म्हणाला आहे.

अपघातानंतर शहाणपण

भुबनचा काही दिवसापुर्वी अपघात झाला होता.या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला शहाणपण आल्याचं अनेकजण म्हणत आहेत.

संबंधित बातम्या

गायक स्वप्नील बांदोडकरचं ‘सांग प्रिये’ रोमॅन्टिक सॉन्ग रिलीज, सप्तसूर म्युझिकची निर्मिती

‘मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?’, श्वेता तिवारी भडकली

विद्यार्थी आंदोलनांमध्ये सतत दिसणारा ‘गोड’ चेहरा, स्वरा भास्करचं जेएनयूशी नातं काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें