चक्क कपिल शर्मा याने कियारा आडवाणी हिला विचारला बेडरूमशी संबंधित हा प्रश्न

कियारा आडवाणी आणि विकी काैशल त्यांच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन हे जोरदार करताना दिसत आहेत.

चक्क कपिल शर्मा याने कियारा आडवाणी हिला विचारला बेडरूमशी संबंधित हा प्रश्न
| Updated on: Dec 21, 2022 | 4:32 PM

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’चा एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये गोविंदा नाम मेरा चित्रपटाची टीम दिसत आहे. कपिल शर्माच्या या एपिसोडमध्ये धमाल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये सर्कस चित्रपटाची टीम आली होती. गोविंदा नाम मेरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कियारा आडवाणी, विकी काैशल आणि चित्रपटाचे निर्माता शशांक खेतान, रेणूका शहाणे यांनी हजेरी लावली होती. इतकेच नाहीतर कपिल शर्माने कियारा आडवाणी हिला असा काही बेडरूमशी संबंधित प्रश्न विचारला की, हे ऐकून सर्वचजण हसायला लागले.

कियारा आडवाणी आणि विकी काैशल त्यांच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन हे जोरदार करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कियारा आणि विकी हे बिग बाॅस 16 मध्ये प्रमोशन करण्यासाठी पोहचले होते.

द कपिल शर्मा शोमध्येही गोविंदा नाम मेरा चित्रपटाची टीम पोहचली आहे. येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल झाला असून या येणाऱ्या एपिसोडमध्ये मोठी धमाल होताना दिसत आहे. कियारा आडवाणीला कपिल शर्मा अनेक प्रश्न विचारतो.

कपिल म्हणतो की, कियारा थोडी वेगळीच आहे. कारण कियारा ही कधीच कुठल्याही पार्टीमध्ये जात नाही. इतकेच नाहीतर मी असेही ऐकले आहे की, कियारा ही रात्री दहाला झोपी पण जाते…

कपिल शर्माचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसायला लागतात. कपिल पुढे कियाराला म्हणतो की, तू इतक्या लवकर रात्री झोपून अक्षय कुमार याला सकाळी उठवण्यासाठी जाते का? यासाठी लवकर झोपते?

कपिल शर्मा कियारा हिच्यानंतर आपला मोर्चा हा शशांक खेतानकडे वळतो. मात्र, शशांकची फिरकी घेण्याच्या नादामध्ये कपिल शर्माचा अडकल्याचे दिसत आहे. आता हाच प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.