मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती 13’ (Kaun Banega Crorepati) ला लवकरच त्याचा पहिला करोडपती मिळू शकतो, ती सुद्धा एक महिला. केबीसीचा 13 वा सीझन 23 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि नुकतंच सोनी टीव्हीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये एक महिला 10 दशलक्षांच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेली आहे. आणि कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की ही महिला दृष्टिहीन आहे जबरदस्त खेळ खेळत ती 1 कोटीपर्यंत पोहोचली आहेत.
प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हिमानी बुंदेला नावाच्या महिलेसोबत स्टेजवर प्रवेश करताना दिसत आहेत. या दरम्यान, बिग बींनी त्या महिलेचा हात पकडला आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगानं कोणत्याही स्पर्धकाला स्पर्श करण्याची परवानगी नाही. मात्र अमिताभ स्वतः त्या महिलेचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन येताना दिसत आहेत.
यानंतर बिग बींनी हिमानी जी अंध असल्याचं सांगितलं आणि नंतर प्रोमोमध्ये अमिताभ थेट 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारताना दिसले. मात्र, तो प्रश्न काय आहे आणि हिमानी 1 कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतील का, हे प्रोमोमध्ये दाखवलेलं नाहीये.
पाहा व्हिडिओ
हिमानी बुंदेला आग्रा येथील रहिवासी आहेत आणि केंद्रीय विद्यालयात गणिताच्या शिक्षिका आहेत. हिमनी प्रचंड मजबूत आहे. तिला डॉक्टर व्हायचं होतं मात्र वयाच्या 15 व्या वर्षी तिनं एका अपघातात आपली दृष्टी गमावली. अपघातानंतर हे स्वप्न तुटलेलं दिसलं, मात्र तिनं हिम्मत हारली नाही. नैराश्यावर मात करण्यासाठी कुटुंबानं खूप मेहनत घेतली. नंतर तिनं पदवी प्राप्त केली आणि बीएड केल्यानंतर मेहनतीच्या बळावर केंद्रीय विद्यालयात तिची निवड झाली. हिमानी गेली चार-पाच वर्षे केबीसीमध्ये नोंदणी करत होती. मात्र या वर्षी तिचा नंबर लागला.
संबंधित बातम्या