Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; बापलेकीची होणार का भेट?

| Updated on: Jun 30, 2022 | 11:44 AM

ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त रिअल लोकेशनचा वापर करण्यात येत आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; बापलेकीची होणार का भेट?
ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे.
Image Credit source: Tv9
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वरा आणि तिच्या बाबांची (Abhijeet Khandkekar) भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमुकल्या स्वराने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलं. एकीकडे आईला गमावल्याचं दु:ख तर दुसरीकडे मामीकडून होणारा जाच. या सर्वात स्वराने मामाच्या सांगण्यावरुन वेष बदलून बाबांचा शोध घेण्यासाठी मुंबई गाठली. मायानगरी मुंबईत (Mumbai) वडिलांचा शोध घेण्यासोबतच स्वराचा जगण्यासाठीही संघर्ष सुरु झालाय. रहायचं कुठे हा प्रश्न तर आहेच. मात्र पोट भरण्यासाठीही तिला बरीच धडपड करावी लागतेय.

बाबांची लवकरात लवकर भेट व्हावी अशी तिची इच्छा असतानाच योगायोगाने साईबाबांच्या मंदिरात स्वरा आणि तिचे बाबा एकत्र येतात. मंदिरात दोघं एकत्र येतात खरे पण बाप-लेकीची भेट होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त रिअल लोकेशनचा वापर करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

विशेष म्हणजे या सीनसाठी एक खास गाणं बनवण्यात आलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं असून कौशल इनामदार यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे शब्द हेमंत सोनावणे आणि दीप्ती सुर्वे यांच्या लेखणीतून उतरले आहेत. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकर स्वराच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.