अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, इन्स्टाग्रामवरुन दिली माहिती

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या (Mrunal Dusanis) घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, इन्स्टाग्रामवरुन दिली माहिती
मृणाल दुसानिस
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 5:28 PM

मुंबई : अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या (Mrunal Dusanis) घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने लहान बाळाच्या कपडे, त्याची खेळणी याचा फोटो शेअर केला आहे. याला तिने ‘आम्ही आमच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झालो आहोत.’, असं कॅपशन दिलं आहे. तिच्या पोस्टवर तिचे चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.

मृणाल दुसानिसची इन्स्टाग्राम पोस्ट

मृणाल दुसानिसच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. मृणालने लहान बाळाच्या कपडे, त्याची खेळणी याचा फोटो शेअर केला आहे. याला तिने ‘आम्ही आमच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झालो आहोत.’, असं कॅपशन दिलं आहे. “आम्ही ठरवलंय की आता जास्त वेळ झोपायचं नाही. घरासाठी वेळ द्यायचा. घर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यायचा. कारण खूप आनंद घेऊन चिमुकली पावलं आता घरभर फिरणार आहेत.”, असं ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे.

मृणाल दुसानिने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. मृणालने शेअर केलेल्या फोटोवर ‘कमिंग सून’ असं लिहिलं आहे. त्यामुळे तिच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी मृणालने विशेष तयारी सुरू केलेली दिसतेय. मृणालने 2016 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज पंडीतसोबत अरेंज मॅरेज केलं. आता तिने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

मृणालने ‘तू तिथे मी’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेली तिची ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिकाही हिट ठरली.

संबंधित बातम्या

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात, “कार उद्ध्वस्त झाली, जीव वाचला” अपघातानंतर भावूक पोस्ट

Lata Mangeshkar health update : लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती

‘खतरों के खिलाडी 10’ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या…