…तर ‘त्या’ हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा, अमेय खोपकरांचं सरकारला चॅलेंज

| Updated on: Jun 16, 2021 | 1:11 PM

मराठी निर्मात्यांकडून कोव्हिडसंबंधी नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे." असा दावा मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन केला आहे.

...तर त्या हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा, अमेय खोपकरांचं सरकारला चॅलेंज
अमेय खोपकर
Follow us on

मुंबई : कोरोनासंबंधी नियमांचं पालन न करणाऱ्या मालिका-चित्रपट निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केले आहे. कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्यास शूटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा, असंही खोपकरांनी सुचवलं आहे. (MNS Ameya Khopkar Warns Thackeray Govt to take action against TV Serial Film Producers not following COVID Protocols)

काय म्हणाले अमेय खोपकर?

“राज्य सरकारने मुंबईत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच शूटिंग करण्याची परवानगी दिलेली आहे आणि तीही बायो-बबलमध्ये. मराठी निर्मात्यांकडून हे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे.” असा दावा मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन केला आहे.

“तरच इंडस्ट्रीत सगळं सुरळीत होईल”

“कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नाही, असं खरंच यंत्रणांना वाटत असेलस तर मग जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक त्यांनी दाखवावी. आणि जर कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर सरकारने शूटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा, तरच या इंडस्ट्रीत सगळं काही पुन्हा सुरळीत होऊ शकेल.” असं मतही अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं आहे.

कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा गेल्या वर्षीही अमेय खोपकर यांनी दिला होता.

मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?

राज्यभरातील कोविडच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला होता. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आहे.

राज्यात चित्रीकरणासाठी एसओपी

कोरोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने सर्व प्रकारच्या चित्रीकरणावर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली होती. मात्र आता संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर

‘… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

(MNS Ameya Khopkar Warns Thackeray Govt to take action against TV Serial Film Producers not following COVID Protocols)