Bigg Boss 16 | अंकित गुप्ता याच्या सपोर्टसाठी राहुल वैद्य मैदानात

बिग बाॅसच्या घरात सहभागी झालेले स्पर्धेक हे सतत भांडताना किंवा वाद घालताना दिसतात.

Bigg Boss 16 | अंकित गुप्ता याच्या सपोर्टसाठी राहुल वैद्य मैदानात
| Updated on: Dec 21, 2022 | 6:13 PM

मुंबई : बिग बाॅस 16 मधील सर्वात आळशी स्पर्धेक म्हणून अंकित गुप्ताची ओळख निर्माण झालीये. अंकित नेहमीच बिग बाॅसच्या घरामध्ये झोपलेला दिसतो. इतेकच नाहीतर टास्क कोणताही असो अंकित हा सारखाच जाबाळ्या देताना दिसतो. जेंव्हा केंव्हा कॅमेरा हा अंकितकडे जातो, त्यावेळी अंकित झोपाच काढताना दिसतो. यामुळे अनेकदा बिग बाॅस अंकितला सुनावताना दिसतात. मात्र, अंकित हा असा आहे की, त्याला काहीच फरक पडत नाही. प्रियंका जे सांगते, तेच फक्त अंकित बोलताना दिसतो.

बिग बाॅसच्या घरात सहभागी झालेले स्पर्धेक हे सतत भांडताना किंवा वाद घालताना दिसतात. कधी भांडणे नसतील तर मस्ती करताना तरी दिसतात. मात्र, यासर्व गोष्टींनी अंकित गुप्ता कायमच अपवाद ठरला आहे. बिग बाॅसने नाॅमिनेशन टास्कवेळी यावरूनच अंकित गुप्ताला सुनावले होते.

बिग बाॅस सीजन 14 मधील स्पर्धेक राहुल वैद्य हा आता थेट अंकित गुप्ता याच्या सपोर्टमध्ये मैदानामध्ये उतरला आहे. राहुल याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यावर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

नुकताच राहुल वैद्य याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून म्हटले आहे की, बिग बाॅस अंकित गुप्तासोबत असा व्यवहार का केला जातो? यापूर्वीही प्रियंका आणि अर्चना यांच्याबद्दल एक पोस्ट राहुल याने शेअर केली होती.

राहुल वैद्य हा बिग बाॅस सीजन 14 मध्ये सहभागी झाला होता. यावेळी रूबिना दिलैकसोबत राहुलचे अनेकदा वाद झाले. राहुल वैद्य याच्या लग्नाला बिग बाॅसच्या घरातील सर्वच सदस्य आले होते. परंतू रूबिना हिने राहुलच्या लग्नाला जाणे टाळले.