Rakhi Sawant | राखी सावंत हिचा तो व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले इतकेच जास्त दु:ख असेल तर…

राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये हे सर्व सुरू असतानाच तिची आई देखील आजारी होती. २९ जानेवारी रोजी राखी सावंत हिच्या आईचे निधन झाले.

Rakhi Sawant | राखी सावंत हिचा तो व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले इतकेच जास्त दु:ख असेल तर...
| Updated on: Jan 31, 2023 | 3:44 PM

मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत बिग बाॅस मराठीमध्ये सहभागी झाली होती. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर केले होते. फोटो शेअर करण्याच्या तब्बल सात महिन्यांच्या अगोदरच राखी सावंत हिने लग्नगाठ बांधली होती. राखीच्या लग्नाचे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता. राखी सावंत हिने अगोदर कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला. इतकेच नाहीतर राखी सावंत हिने लग्नानंतर आपले नावही बदलून टाकले. हे सर्व सुरू असतानाच राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न (Marriage) नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत असे म्हटले होते. यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या आणि शेवटी आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न स्वीकारले. राखी सावंत हिने सांगितले होते की, सलमान खान याने आदिल दुर्रानी याला फोन करून समजावले होते.

राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये हे सर्व सुरू असतानाच तिची आई देखील आजारी होती. २९ जानेवारी रोजी राखी सावंत हिच्या आईचे निधन झाले. आईचे निधन झाल्यानंतर राखी सावंत हाॅस्पीटलबाहेर रडताना दिसली होती.

नुकताच सोशल मीडियावर राखी सावंत हिने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी रडताना दिसल आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला दिलासा दिला आहे.

राखी सावंत हिच्या व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप देखील घेतला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, इतकी जास्त दु:खात आहे तर मग व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्याची काय गरज आहे हिला. राखी सावंत हिचा हा रडतानाचा व्हिडीओ शेअर करणे नेटकऱ्यांना पटले नाहीये.

हा व्हिडीओ पाहून लोक मोठ्या प्रमाणात राखी सावंत हिला ट्रोल करत आहेत. मात्र, काहीजण हे राखी सावंत हिच्या सपोर्टसाठी मैदानात उतरले आहेत. राखी सावंत हिच्या आईला तीन वर्षांपूर्वी कॅंन्सर झाला होता.

राखी सावंत हिच्या आईच्या उपचारासाठी सलमान खान आणि मुकेश अंबानी यांनी मदत केली होती. मात्र, राखी सावंत हिच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडत होते.