
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिध्द नाव म्हणजे रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आहे. रुबिना दिलैक कायमच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. रुबिना बिग बाॅसची विजेती आहे. बिग बाॅसच्या घरात असताना आपण पाहिले असेल की, ज्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये रुबिनाची काही चूक नसेल आणि सलमान खान (Salman Khan) तिला काही बोलत असेल तर अशावेळी ती सलमान खानचे देखील ऐकून घेत नव्हती. रुबिनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, रुबिनाला खरी ओळख बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरातूनच मिळालीये. रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे दोघेही बिग बाॅसमध्ये सहभागी झाले होते.
नुकताच रुबिनाने सोशल मीडियावर दोन खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या रुबिना झलक दिखालाजा सीजन 10 मध्ये सहभागी झालीये. यापूर्वी खतरो के खिलाडी या शोमध्ये रुबिना दिसली होती. नुकतेच रुबिनाने इंस्टाग्रामवर पती अभिनव शुक्लासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुबिना योगा करताना दिसत आहे. हा फोटो रुबिनाच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
या फोटोमध्ये अभिनव योगा मॅटवर झोपला आहे आणि रुबिना अभिनवच्या पायावर हात ठेवून दोन्ही पाय हवेत स्थिर करते आहे. हा एक अत्यंत अवघड योगा आहे. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी रुबिना कायमच व्यायाम करताना दिसते. बऱ्याच वेळा रुबिना जिममध्ये व्यायाम करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते. रुबिनाचा हा योगा करतानाचा फोटो आता सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय.