Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?

| Updated on: Sep 02, 2021 | 12:17 PM

‘बिग बॉस 13’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली आहे. तरुण अभिनेत्याच्या निधांच्या वृत्ताने अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवासही तसा अनपेक्षितच होता.

Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?
सिद्धार्थ शुक्ला
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस 13’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली आहे. तरुण अभिनेत्याच्या निधांच्या वृत्ताने अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवासही तसा अनपेक्षितच होता. त्याला कधी अभिनेता व्हायचे नव्हते. पण आईच्या एका हट्टामुळे त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवास सुरु झाला.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे.

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

मॉडेलिंग करण्याचा निर्णय

तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7’च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं ‘सावधान इंडिया’  आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा :

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, वयाच्या 40व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Siddharth Shukla Passes away | ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन