AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : होतं काळजाचं पाणी पाणी… जान्हवी अन् सूरज चव्हाणचा झापूक झुपूक डान्स

Suraj Chavan and Janhavi Killekar Dance Video : सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांनी बिग बॉसच्या घरात धमाकेदार डान्स केलाय. या दोघांच्या डान्सचा व्हीडिओ सोळल मीडियावर चर्चेत आहे. सूरज आणि जान्हवीचा झापूक झुपूक डान्स सध्या व्हायरल होतोय. तुम्ही पाहिलात? वाचा सविस्तर...

Video : होतं काळजाचं पाणी पाणी... जान्हवी अन् सूरज चव्हाणचा झापूक झुपूक डान्स
जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाणImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 02, 2024 | 12:41 PM
Share

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. पाचवा आठवडा सरत आला. आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. कालच्या ‘भाऊचा धक्का’वर विविध गोष्टी घडल्या. यावेळी बिग बॉसच्या घरातील सदस्य गाण्यांवर थिरकताना दिसले. गुलीगत सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा देखील बिग बॉसच्या घरात धम्माल करताना दिसतोय. सूरजची झापूक झुपूक स्टाईल प्रेक्षकांनादेखील आवडते आहे. त्याचे डायलॉग, डान्स अन् बिग बॉसच्या घरातील वावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतो. आता एका वेगळ्या रूपात सूरज दिसला आहे. ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये सूरज आणि जान्हवी किल्लेकर हे डान्स करताना दिसले.

सूरज अन् जान्हवीचा झापूक झुपूक डान्स

सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांनी ‘भाऊचा धक्का’ या विशेष एपिसोडममध्ये कल्ला केला. ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर दोघांनी डान्स केला. सूरजची खास झापुक झुपूक स्टाईल देखील यावेळी पाहायला मिळाली. दोघांनी झापुक झुपूक स्टाईलने डान्स केला. हा डान्स बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी देखील इन्जॉय केला. या दोघांचा डान्स सोशल मीडियावर चर्चेत आहे. सूरजची झापुक झुपूक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळाली. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि निक्कीचा कपल डान्सदेखील पाहायला मिळाला. सर्व जोड्यांचा कल्ला ‘बिग बॉस प्रेमी’साठी मनोरंजक होता.

भाऊचा धक्कावर सूरज आणि जान्हवी यांनी केलेला डान्स प्रेक्षकांना भावला आहे. प्रेक्षकांनी या डान्सला पसंती दिलीय. सुरज भाऊच्या डान्सचा नादच करायचा नाही. मटकीला मोड नाही. सुरजभाऊला तोड नाही… एकनंबर डान्स, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केलीय. फायर परफॉर्मन्स… आता कसं मस्त… आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सूरजची ही ‘गुडघा बेंड’ डान्स स्टेप 100 % साऊथ फिल्ममध्ये कॉपी केली जाणार आहे, अशी कमेंट याआधीच्या बिग बॉसमधील स्पर्धक उत्कर्ष शिंदे याने केली आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन आता 36 दिवस उलटले आहेत. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगस्यांची चांगलीच शाळा घेतली. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून कोणीही सदस्य बाहेर पडलं नाही. आता हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट