Tunisha Sharma Death | टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर केली आत्महत्या

तुनिषा शर्मा ही दास्तान ए काबुल या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये होती.

Tunisha Sharma Death | टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर केली आत्महत्या
Tunisha Sharma
| Updated on: Dec 24, 2022 | 7:27 PM

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी पुढे येतंय. तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केलीये. माहितीनुसार टी ब्रेकमध्ये तिने आत्महत्या केली आहे. टॉयलेटमध्ये गेलेल्या तुनिषा शर्मा हिने बऱ्याच वेळ दरवाजा उघडला नसल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला, त्यावेळी तुनिषा शर्मा हिने फाशी घेतल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी सांगितले, आत्महत्येची माहिती मिळाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे.

तुनिषा शर्मा ही दास्तान ए काबुल या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये होती. मात्र, अचानकच तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तुनिषा शर्मा हिने इतके मोठे पाऊल नेमके का उचलले हे कोणालाच कळत नाहीये. तुनिषा शर्मा हिला हाॅस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. परंतू त्याठिकाणी डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे कळते आहे.

तुनिषा शर्माने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून कळू शकले नाहीये. पोलिसांनी तपासाला सुरूवात केल्याचे देखील सांगितले जात आहे. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये.

तुनिषा शर्मा ही अवघ्या वीस वर्षांची होती. हिने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या मालिकेमध्येही तुनिषा शर्माने डेब्यू केला होता.