प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन, एका सिनेमॅटोग्राफरने देखील गमावले प्राण

सिनेविश्वातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचं आणि सिनेमॅटोग्राफरचं रस्ते अपघातात निधन झालं आहे... त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन, एका सिनेमॅटोग्राफरने देखील गमावले प्राण
| Updated on: May 11, 2026 | 11:00 AM

Telugu actor Bharath Kanth Death News: सिनेविश्वातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन झालं असून एका सिनेमेटोग्राफरने देखील प्राण गमावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार साउथ सिनेविश्वातील अभिनेता भरत कांत याचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. भरत तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक तरुण अभिनेता होता आणि त्याने काही सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका देखील साकारली होती. अभिनेत्याने 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टेनंट’ या सिनेमात देखील काम केलं होतं, जिथे त्याच्या अभिनयाचे कौतुक सर्वांनीच केलं.

आता, त्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. सूत्रांनुसार, नेल्लोरहून हैदराबादला जात असताना अभिनेत्याचा अपघात झाला. त्याची कार भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर लॉरीला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत गाडीत असलेले सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांचाही मृत्यू झाला.

अभिनेता भरत यांचं फार कमी वयात निधन झाल्यामुळे चाहतत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनाती माहिती कळताच, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तर सिनेमॅटोग्राफर त्रिलोक देखील इंडस्ट्रीतील ओळखीचा चेहरा होता. दोघांच्या जाण्याने सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे…

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री आउटर रिंग रोडच्या एक्झिट क्रमांक 12 जवळ घडला. हा परिसर हैदराबादमधील आदिबटला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. आदिबटला पोलीस ठाण्याने सांगितल्यानुसार, त्यांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये झळकलेली भरत कांत?

निधनानंतर दोन्ही कलाकारांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सेलिब्रिटींच्या चाहत्यांवर आणि कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे… अभिनेता भरत कांत यांच्याबद्दल सांगायतं झाल्यास, तो ‘ग्राम’ या वेब सीरिजमध्ये दिसलेला . तो एका हिंदी वेब सीरिजमध्येही झळकला. पण, त्याला सर्वाधिक लोकप्रियता 2024 साली प्रदर्शित झालेल्या ‘टेनंट’ या सिनेमातून मिळाली, ज्यामध्ये त्याने ऋषीची भूमिका साकारली होती. सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, सिनेमाने केवळ 28 लाख रुपयांची कमाई केली.

Follow Us