Thalapathy Vijay: जिंकूनही हरला थलपती विजय; आई-वडील, गर्लफ्रेंडचीही साथ पण..

थलपती विजय हे जरी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 'किंग' ठरले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते हरले आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे. या मोठ्या यशानंतर त्यांची पत्नी किंवा मुलाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

Thalapathy Vijay: जिंकूनही हरला थलपती विजय; आई-वडील, गर्लफ्रेंडचीही साथ पण..
थलपती विजय, पत्नी आणि मुलं
Image Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2026 | 1:25 PM

अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत या पक्षाने 234 पैकी 104 जागांवर विजय मिळवला आहे. संपूर्ण देशभरात या अभूतपूर्व कामगिरीची चर्चा आणि कौतुक होत आहे. विजय यांचे चाहतेसुद्धा त्यांच्यावर खूप खुश आहेत. तमिळनाडूतील रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये, चौकाचौकात सध्या विजय यांच्याच नावाचा जयघोष होत आहे. विजय यांचे आईवडील आणि इतर कुटुंबीयांनी आनंद साजरा केला, तर कथित गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन त्यांच्या घरी पोहोचली होती. अशातच विजय यांची पत्नी संगीता आणि दोन्ही मुलं मात्र कुठेच दिसली नाहीत. विजय यांच्या मुलाने वडिलांच्या यशावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसंच त्याच्या पत्नीनेही एक शब्दही उच्चारलेला नाही. त्यामुळे विजय यांनी तमिळनाडूतील लोकांची आणि चाहत्यांची मनं जिंकली तरी एक वडील आणि पती म्हणून ते हरले आहेत, असं म्हटलं जात आहे.

या ऐतिहासिक निकालानंतर विजय यांनी सर्वप्रथम आपल्या आईवडिलांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यानंतर घरातील बाल्कनीमध्ये येऊन त्यांनी चाहत्यांना आणि समर्थकांना अभिवादन केलं. विजयसुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी दिसले, परंतु त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी तिथे उपस्थित नव्हते. 4 मे हा दिवस विजय आणि त्रिशा या दोघांसाठीही खास ठरला. कारण एकीकडे विजय यांना निवडणुकीत यश मिळालं, तर दुसरीकडे त्रिशाने तिचा 43 वा वाढदिवस साजरा केला. सकाळी तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेतल्यानंतर ती थेट विजय यांच्या घरी पोहोचली होती.

फक्त त्रिशाच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींपासून ते त्यांच्या लाखो चाहत्यांपर्यंत, अनेकांनी जल्लोष साजरा केला. रश्मिका मंदाना, नयनतारा, कमल हासन, रजनीकांत यांसारख्या सेलिब्रिटींनी विजय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी संगीता मात्र या सर्व जल्लोषापासून दूर होते. मुलगा जेसन संजय याने विजय यांना खूप आधीच सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. वडील आणि मुलामधील मतभेद स्पष्ट दिसत होते. त्यातही त्रिशासोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे मुलगा त्यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. जेसन संजयचा जन्म 2000 मध्ये झाला असून तो आता 26 वर्षांचा आहे. जेसनला दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करायचं आहे, पण त्याने वडिलांचं आडनाव सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.

मुलगी दिव्या साशानेही वडिलांच्या विजयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 2005 मध्ये तिचा जन्म झाला असून ती बॅडमिंटनपटू आहे. दिव्या लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. थलपती विजय यांची पत्नी संगीतानेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात तिने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Follow Us