रेखाच्या मांडीवर बसलेल्या या मुलाने शाहरुख-सलमानला दिलेली टक्कर, लाखो मुली त्याच्यावर होत्या फिदा, कोण आहे तो?

रेखाच्या कुशीत दिसणारा हा गोंडस मुलाला ओळखलं का? एकेकाळी लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करत होता. शाहरुख, सलमान आणि आमिर खानला द्यायचा टक्कर.

रेखाच्या मांडीवर बसलेल्या या मुलाने शाहरुख-सलमानला दिलेली टक्कर, लाखो मुली त्याच्यावर होत्या फिदा, कोण आहे तो?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 26, 2026 | 3:30 PM

बॉलिवूडमधील ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता जुगल हंसराज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर त्याच्या बालपणीच्या एका गोंडस फोटोमुळे. सोशल मीडियावर सध्या जुगल हंसराजचा अभिनेत्री रेखा यांच्या सोबतचा लहानपणीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.

या व्हायरल फोटोमध्ये रेखा यांच्या कुशीत बसलेला छोटासा जुगल हंसराज अतिशय निरागस आणि गोड दिसत आहे. रेखा यांनी त्याला प्रेमाने मिठी मारलेली दिसते, तर जुगलही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत हसताना दिसतो आहे. या फोटोतील दोघांमधील जिव्हाळा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रोमँटिक हिरो म्हणून लोकप्रियता

याआधीही रेखा आणि जुगल हंसराज यांचे बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या दोघांमध्ये चांगले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. या नव्या फोटोलाही सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्यावर कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जुगल हंसराजने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर मोहब्बतें चित्रपटातून त्याने रोमँटिक हिरो म्हणून लोकप्रियता मिळवली. त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे, आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि ‘चॉकलेटी बॉय’ प्रतिमेमुळे तो त्या काळात तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. अनेकांच्या मते, त्याच्या चाहत्यांची संख्या त्या काळात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या तोडीची होती.

आता कुठे आहे हंसराज?

मात्र, काही चित्रपटांनंतर जुगल हंसराजने चित्रपटसृष्टीपासून हळूहळू अंतर ठेवले. सध्या तो पत्नी जॅस्मिन आणि मुलासोबत अमेरिकेत स्थायिक झाला असून, कुटुंबासोबत शांत आयुष्य जगत आहे. चित्रपटांपासून दूर असला तरी सोशल मीडियावर त्याच्या जुन्या आठवणी आणि फोटोंमुळे तो अधूनमधून चर्चेत येत असतो.

दरम्यान, रेखा यांच्या कुशीतला हा गोंडस फोटो पुन्हा एकदा चाहत्यांना जुगल हंसराजच्या बालपणाच्या आठवणींमध्ये घेऊन गेला असून, सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us