इतकं सुपरहिट गाणं की दुकानांबाहेर कॅसेट घेण्यासाठी व्हायची प्रचंड गर्दी, 32 वर्षांपासून प्रचंड क्रेझ

90 च्या दशकातील सर्वात सुपरहिट गाणं, इतकं सुपरहिट की त्याची कॅसेट घेण्यासाठी दुकानांबाहेर व्हायची प्रचंड गर्दी. 32 वर्षानंतर देखील चाहत्यांमध्ये याच गाण्याची प्रचंड क्रेझ.

इतकं सुपरहिट गाणं की दुकानांबाहेर कॅसेट घेण्यासाठी व्हायची प्रचंड गर्दी, 32 वर्षांपासून प्रचंड क्रेझ
| Updated on: Sep 18, 2026 | 5:14 PM

90 च्या दशकात मनोरंजनासाठी टीव्ही, रेडिओ आणि कॅसेट हेच प्रमुख माध्यम होते. एखाद्या चित्रपटातील गाणे आवडले की, त्याची कॅसेट खरेदी करून ते गाणे वारंवार ऐकण्याचा ट्रेंड होता. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीना टंडन यांच्या ‘मोहरा’ चित्रपटातील ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले होते. आजही या गाण्याची धून ऐकली की 90 च्या दशकातील कॅसेट प्लेअर, लग्नसमारंभ आणि टीव्हीवरील म्युझिक शोच्या आठवणी ताज्या होतात.

‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ या गाण्याला उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला होता. विजू शाह यांनी या गाण्याला संगीत दिले तर गीतकार आनंद बक्षी यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची चाल आणि सादरीकरण प्रेक्षकांना विशेष भावले.

हे गाणं केवळ चित्रपटाचा भाग राहिले नाही तर स्वतंत्रपणेही श्रोत्यांच्या पसंतीस उतरले. त्याच्या तालावर त्या काळात अनेक कार्यक्रम आणि लग्नसमारंभ रंगत असत.

‘मोहरा’च्या कथानकासोबत कलाकारांचीही चर्चा

राजीव राय यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि नसीरुद्दीन शाह यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय परेश रावल, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद आणि सदाशिव अमरापूरकर यांसारखे कलाकारही चित्रपटात झळकले.

अॅक्शन आणि थ्रिलर कथानक असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

चित्रपटातील इतर गाणीही ठरली सुपरहिट

‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’सोबतच ‘टिप टिप बरसा पानी’, ‘ना कजरे की धार’ आणि ‘सुबह से लेकर शाम तक’ यांसारखी गाणीही लोकप्रिय झाली होती. त्यामुळे ‘मोहरा’चा संगीत अल्बम 90 च्या दशकातील लक्षात राहणाऱ्या चित्रपट संगीत अल्बमपैकी एक ठरला.

आजच्या डिजिटल युगात एका क्लिकवर हजारो गाणी ऐकायला मिळतात. मात्र, ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ हे गाणे ऐकताना अनेकांना जुन्या कॅसेटच्या काळातील आठवणी पुन्हा अनुभवायला मिळतात. 90 च्या दशकातील संगीतप्रेमींसाठी हे गाणं आजही जुन्या आठवणींशी जोडलेले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us