
मुंबई : बिग बॉस मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. थेट बिग बाॅसच्या घरातील प्रकरण पोलिस ठाण्यात जाऊन पोहचले आहे. इतकेच नाही तर एका स्पर्धकावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणानंतर बिग बॉसचे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. थेट या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. यामुळेच मोठी खळबळ ही बघायला मिळतंय. फक्त बिग बॉसच्या घरातील एक सदस्य नाही तर बिग बॉसच्या निर्मात्यांच्या अडचणीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट बघायला मिळत आहे.
यामुळेच पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी या नक्कीच घडू शकतात. कन्नड बिग बॉस 10 मध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. ज्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. कन्नड बिग बॉस 10 मधील स्पर्धेक तनीषा कुप्पंदा हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. इतकेच नाही तर या प्रकरणात थेट कन्नड बिग बॉस 10 च्या निर्मात्यांना देखील ओढण्यात आलंय.
तनीषा कुप्पंदा हिने एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे तिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. तनीषा कुप्पंदा हिने कन्नड बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये भोवी समाजाविरोधात थेट चुकीचे शब्द वापरल्याचा आरोप आहे. तनीषा कुप्पंदा हिला हे प्रकरण चांगलेच भोवल्याचे देखील आता स्पष्ट दिसंतय.
तनीषा कुप्पंदा हिच्या विरोधात थेट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा अंतर्गत थेट बंगळुरूमधील कुंबलगोडू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटक भोवी समाजाचे अध्यक्ष पी. पद्मा यांनी याप्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतकेच नाही तर या एफआयआरमध्ये थेट कलर्स कन्नड टीव्हीचे नाव देखील घेण्यात आल्याने मोठी खळबळ ही बघायला मिळतंय. 8 नोव्हेंबरला प्रसारित झालेल्या या एपिसोडमुळे मोठा हंगामा होताना दिसतोय. तनीषा कुप्पंदा हिच्या विरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये देखील या प्रकरणात काही मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता नक्कीच आहे.