60 च्या दशकातील रोमँटिक गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून, आजही वेळ काढून ऐकतात लोक

60 च्या दशकातील अजरामर प्रेमगीत. ज्यात मांडण्यात आली आहे प्रेमाची सुंदर भावना. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा सुरेल आवाजामुळे आजही हे गाणं सुपरहिट.

60 च्या दशकातील रोमँटिक गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून, आजही वेळ काढून ऐकतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 02, 2026 | 9:44 PM

जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की 1960च्या दशकातील अनेक अजरामर गाण्यांची आठवण होते. याच काळातील एक सुंदर आणि हळुवार प्रेमगीत म्हणजे ‘मैंने एक ख्वाब सा देखा है’. या गाण्यातील ‘मैंने देखा है कि फूलों से लदी शाखों में’ ही ओळ आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. निसर्गाच्या सुंदर पार्श्वभूमीवर प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजाने विशेष उंची मिळवून दिली.

1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वक्त’ या चित्रपटातील हे गाणं आहे. यामध्ये सुनील दत्त आणि साधना यांच्यावर हे रोमँटिक गाणं चित्रित करण्यात आले होते. गाण्याचे संगीत प्रसिद्ध संगीतकार रवी यांनी दिले, तर गाण्याचे शब्द प्रतिभावान गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिले होते.

Loading...

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांची सुरेल जुगलबंदी

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा मधुर आवाज. दोन्ही गायकांनी आपल्या गायकीतून प्रेमातील हळुवार भावना, लाज आणि एकमेकांबद्दलची ओढ सुंदरपणे व्यक्त केली आहे. गाण्यातील संवादात्मक शैलीमुळे ते केवळ एक प्रेमगीत न राहता प्रेमिकांमधील भावनिक संवाद वाटतो.

‘फुलांनी बहरलेल्या फांद्यांमध्ये तू माझ्या जवळ आलीस’ अशा कल्पनेतून गाण्याची सुरुवात होते. पुढे वाहणारे झरे, धुक्याने भरलेल्या दऱ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात व्यक्त होणारे प्रेम यांचे सुंदर चित्रण या गाण्यात पाहायला मिळते. साहिर लुधियानवी यांच्या काव्यात्मक शब्दांना रवी यांच्या संगीताची साथ लाभल्यामुळे या गाण्याला एक वेगळीच रोमँटिक अनुभूती मिळते.

आजही प्रेक्षकांचं आवडतं गाणं

1965 मध्ये प्रदर्शित झालेले हे गाणं आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांसाठी खास आहे. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचे सुरेल गायन, साहिर यांचे काव्य आणि रवी यांचे संगीत यांचा सुंदर संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. जुन्या काळातील प्रेमाची निरागसता आणि संगीताची माधुर्यपूर्ण शैली अनुभवायची असेल तर ‘मैंने एक ख्वाब सा देखा है’ हे गाणे नक्कीच ऐकण्यासारखे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us