‘द केरला स्टोरी’ मधील मुख्य अभिनेत्री अदा शर्माला या कारणामुळे बदलावा लागला फोन नंबर, जाणून घ्या!

चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्मा देखील चांगलीच चर्चेत आहे. सगळीकडे तिच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. अदा शर्मानं तिचा मोबाईल नंबर लिक झाल्यानंतर संतान व्यक्त केला आहे.

द केरला स्टोरी मधील मुख्य अभिनेत्री अदा शर्माला या कारणामुळे बदलावा लागला फोन नंबर, जाणून घ्या!
द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने कमाईमध्ये अनेक बाॅलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे. काही ठिकाणी सतत चित्रपटाला विरोध हा केला जातोय.
Harish Malusare | Updated on: May 25, 2023 | 11:24 PM

मुंबई : सध्या ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट वादात जरी सापडला असला तरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटासोबतच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्मा देखील चांगलीच चर्चेत आहे. सगळीकडे तिच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे. तसंच तिच्या चाहत्यांच्या संख्येतही लाखोंच्या संख्येने वाढ झाली आहे. अशातच अदा शर्माचा मोबाईल नंबर लिक झाला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली असून या प्रकारानंतर तिला केरला स्टोरीतील एका सीनची आठवण झाली आहे. याबाबत तिनं स्वतः सांगितलं आहे.

अदा शर्मानं तिचा मोबाईल नंबर लिक झाल्यानंतर संतान व्यक्त केला आहे. तिनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, मला या गोष्टीचा आधीच अंदाज आला होता, जेव्हा मला खूप सारे फोन आणि मेसेज आले होते. मला धमकीही देण्यात आली होती.

अदानं सांगितलं की, हा प्रकार झाल्यानंतर मला समजलं एखादा व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊन हे नीच कृत्य करू शकतो. तसंच यावेळी अदाला केरला स्टोरीतील एका सीनची आठवण देखील झाली, ज्यामध्ये काही मुलींचा फोन नंबर पब्लिक केला जातो आणि त्यानंतर त्या मुली खूप त्रस्त होतात.

ज्या व्यक्तीनं तिच्यासोबत हे कृत्य केलं आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तसंच तिला तिचा फोन नंबर बदलावा लागल्याचं अदानं सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us