The Kerala Story Collection : ‘द केरळ स्टोरी’ची सुसाट घोडेदौड, 6 चित्रपटांना टाकले मागे, 15 व्या दिवशी केली इतकी कमाई

| Updated on: May 20, 2023 | 9:33 AM

The Kerala Story BO Collection Day 15 : बॉक्स ऑफिसवर 'केरळ स्टोरी'ची कमाई सुरूच आहे. अदा शर्माच्या चित्रपटाने रिलीजच्या 15 दिवसांनंतरही चांगला व्यवसाय केला आहे.

The Kerala Story Collection : द केरळ स्टोरीची सुसाट घोडेदौड, 6 चित्रपटांना टाकले मागे, 15 व्या दिवशी केली इतकी कमाई
'द केरळ स्टोरी' चित्रपटाची घोडदौड सुरूच
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने (The Kerala Story) लोकांना कथेबद्दल विचार करायला भाग पाडले आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हा पूर्णपणे एकतर्फी चित्रपट आहे. दुसरीकडे, काही लोक याकडे हिंदू-मुस्लिम कथा म्हणून पाहत आहेत. अभिनेत्री अदा शर्माची (Adah Sharma) भूमिका असलेल्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फार कमी दिवसांत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटासदंर्भात बराच वाद सुरू असून त्या वादातून असे प्रमोशन मिळाले आहे की या चित्रपटाचे नाव सर्वसामान्यांपासून खास लोकांच्या कानावरही पडले आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाचा 16 वा दिवस उजाडला असून सलग 15 दिवस या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. 15 व्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ने जबरदस्त कलेक्शन करून सर्वांनाच चकित केले आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटींची कमाई करेल असा विश्वास आहे. ‘द केरळ स्टोरी’ने आतापर्यंत 170 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या मागील 6 चित्रपटांना मागे टाकले आहे.

सलमान खानपासून ते रणबीर कपूरपर्यंतचे चित्रपटही कमाईच्या बाबतीत ‘द केरळ स्टोरी’च्या मागे पडले आहेत. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा 2023 मधील दुसरा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि रणबीर कपूर याच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ने 15 व्या दिवशी 6 कोटींचा गल्ला जमवला आहे. 15 दिवसांनुसार ही कमाई देखील चांगली मानली जाते. शनिवार आणि रविवारची आकडेवारी या चित्रपटाला 200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री देऊ शकते. 15 दिवसांच्या एकूण कलेक्शनची भर घालत या चित्रपटाने आतापर्यंत 177.72 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ने 10व्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन केले. 10व्या दिवशी या चित्रपटाने 23 कोटींहून अधिक कमाई केली होती. 9व्या दिवसाची आकडेवारीही सुखावणारी होती. या चित्रपटासाठी टॅक्स फ्रीची चर्चाही कायम आहे. जिथे अनेक ठिकाणी सरकारने हा चित्रपट पूर्णपणे मोफत बनवला आहे. त्याचबरोबर काही सरकारांनी या चित्रपटातून कर काढून टाकला आहे. अशा परिस्थितीत ‘द केरळ स्टोरी’ अदा शर्मासाठी मैलाचा दगड ठरताना दिसत आहे.